एक्स्प्लोर
डाईव्ह मारताना कोहलीला दुखापत, मैदानातून बाहेर

रांची : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रांचीमध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी, विराट कोहलीला मैदानातून बाहेर जावं लागलं. खरंतर चौकार रोखण्याच्या प्रयत्नात असलेल्या कोहलीने बाऊंड्री लाईन डाईव्ह मारली. पण या प्रयत्नात त्याच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली. उपहारानंतर रवींद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर पीटर हॅण्ड्सकॉम्बने मिड-विकेटला बॉल टोलवला. कोहलीने डाईव्ह मारुन बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. पण खाली पडताना त्याचा उजवा खांदा जमिनीवर आदळला. यावेळी विराट कोहलीच्या खांद्यात वेदना जाणवू लागल्या. त्यानंतर कोहली मैदान सोडून गेला. विराट कोहलीच्या जागी अभिनव मुकुंद मैदानात आहे. तर अजिंक्य रहाणे टीम इंडियाचं नेतृत्त्व करत आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























