Virat Kohli, KL Rahul : दोस्ती असावी तर अशी! 32 वर्षात कुणालाच जमलं नाही ते फक्त केएल राहुल आणि किंग कोहलीनं करून दाखवलं
Virat Kohli, KL Rahul : विराट कोहलीनंतर केएल राहुल आफ्रिकेतील वनडे मालिकेत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करणारा दुसरा भारतीय कर्णधार ठरला.
Virat Kohli, KL Rahul : केएल राहुलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर इतिहास रचला. विराट कोहलीनंतर केएल राहुल आफ्रिकेतील वनडे मालिकेत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करणारा दुसरा भारतीय कर्णधार ठरला. यापूर्वी 2018 मध्ये विराट कोहलीने हा पराक्रम केला होता. आता केएल राहुलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 3 सामन्यांची वनडे मालिका 2-1 ने जिंकली.
The only two Indian captains who conquered the ODI series in South Africa. pic.twitter.com/cQx9Dp3vGh
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 21, 2023
आफ्रिकेत भारत-दक्षिण आफ्रिका द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेचे निकाल
1992/93- दक्षिण आफ्रिका 5-2 ने जिंकली
2006/07- दक्षिण आफ्रिका 4-0 ने जिंकली
2010/11- दक्षिण आफ्रिका 3-2 ने जिंकली
2013/14- दक्षिण आफ्रिका 2-0 ने जिंकली
2017/18- भारत 5-1 ने जिंकला
2021/22- दक्षिण आफ्रिका 3-0 ने जिंकली
2023/24- भारत 2-1 ने जिंकला
2018 मध्ये, विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने आफ्रिकेच्या भूमीवर 6 सामन्यांच्या वनडे मालिकेत आफ्रिकेचा 5-1 ने पराभव केला. 1992 पासून आत्तापर्यंत, भारतीय संघाने आफ्रिकेविरुद्ध त्यांच्याच भूमीवर एकूण 7 द्विपक्षीय एकदिवसीय मालिका खेळली आहे, ज्यामध्ये त्यांना फक्त दोनदा विजय मिळाला आहे. पहिला विजय कोहलीच्या नेतृत्वाखाली आणि आता दुसरा विजय राहुलच्या नेतृत्वाखाली मिळाला.
KL Rahul becomes only the 2nd Indian captain in history after Virat Kohli to win an ODI series in South Africa. pic.twitter.com/nl5BxrC3fw
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 21, 2023
संजू सॅमसनने तिसऱ्या वनडेत शतक झळकावले
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसर्या एकदिवसीय सामन्यात संजू सॅमसनने शानदार शतक झळकावले, ज्यामुळे टीम इंडिया मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 50 षटकात 8 विकेट गमावत 296 धावा केल्या, ज्यामध्ये संजू सॅमसनने 114 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 108 धावा केल्या. याशिवाय टिळक वर्माने 52 धावांची खेळी खेळली, ज्यात 5 चौकार आणि 1 षटकार होता. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 45.5 षटकांत सर्वबाद 218 धावांवर आटोपला. टोनी डी जॉर्जीने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली. डी जॉर्जीने 87 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 81 धावा केल्या. मात्र, जॉर्जीची ही खेळी संघाला विजयाचा उंबरठा ओलांडू शकली नाही.
KL Rahul is the only player from the World Cup squad on the ODI series decider today.
— Johns. (@CricCrazyJohns) December 21, 2023
- We are witnessing the rise of Captain Rahul. 🫡 pic.twitter.com/W42rzSew1F
इतर महत्वाच्या बातम्या