एक्स्प्लोर

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून कोलकात्याचा आठ विकेट्सनी धुव्वा; सातव्या विजयासह बंगलोर गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर

आयपीएल 2020 च्या 39 व्या सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोलकाता नाईट रायडर्सचा आठ गडी राखून पराभव केला.

KKR vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं कोलकात्याचा 8 विकेट्सनी धुव्वा उडवून गुणतालिकेतलं आपलं स्थान आणखी मजबूत केलं आहे. या सामन्यात कोलकात्यानं बंगलोरला अवघ्या 85 धावांचं आव्हान दिलं होतं. बंगलोरच्या फलंदाजांनी हे आव्हान 14व्या षटकातच आठ विकेट्स राखून पार केलं. बंगलोर सध्या 14 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.

या मोसमातील आरसीबीचा हा सातवा विजय आहे. यासह ती मुंबई इंडियन्सला मागे ठेवून पॉइंट टेबलमध्ये दुसर्‍या स्थानावर पोहोचली आहे. आरसीबीकडून मोहम्मद सिराजने शानदार गोलंदाजी केली. त्याने चार षटकांत दोन निर्धाव षटकांसह केवळ आठ धावा देऊन तीन बळी घेतले.

धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला आणखी एक धक्का! दुखापतीमुळे ड्वेन ब्राव्होची आयपीएलमधून माघार

कोलकात्याच्या फलंदाजांचं लोटांगण नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या केकेआरची अत्यंत खराब सुरुवात झाली. दुसर्‍याचं षटकात केकेआरचा सलामीवीर राहुल त्रिपाठीने विकेट गमावली. पुढच्याच चेंडूवर नितीश राणाही खाते न उघडताच माघारी परतला.

यानंतर तिसऱ्या षटकात नवदीप सैनीच्या चेंडूवर शुभमन गिलही अवघ्या एका धावावर झेलबाद झाला. अशाप्रकारे केकेआरने त्यांचे तीन फलंदाज फक्त तीन धावांमध्ये गमावले. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या टॉम बँटनने एक चौकार आणि एक षटकार ठोकला. पण तोही केवळ 10 धावा करून सिराजच्या हाती झेलबाद झाला.

मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहलच्या भेदक माऱ्यासमोर कोलकात्याला 20 षटकात आठ बाद 84 धावाच करता आल्या. सिराजनं केवळ आठ धावांत तीन विकेट्स घेतल्या. तर चहलनंही दोन विकेट्स काढून त्याला चांगली साथ दिली. कोलकात्याकडून केवळ तीन फलंदाजांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. कर्णधार ऑईन मॉर्गननं सर्वाधिक 30 धावांचं योगदान दिलं.

सिराजची ऐतिहासिक कामगिरी

बंगलोरच्या मोहम्हद सिराजनं या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी करताना चारपैकी दोन षटकं निर्धाव टाकली. आयपीएलच्या आजवरच्या इतिहासात सामन्यात दोन निर्धाव षटकं टाकणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला. त्यानं कोलकात्याच्या राहुल त्रिपाठी, नितीश राणा आणि टॉम बॅन्टन या आघाडीच्या फलंदाजांना माघारी धाडून बंगलोरच्या विजयात मोलाचं योगदान दिलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
IPO Update : यूनिमेक एअरोस्पेसनं शेवट गोड केला, 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, गुंतवणूकदारांचं लक्ष इंडो फार्मच्या आयपीओकडे, GMP कितीवर?
यूनिमेक एअरोस्पेसचा आयपीओ 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, इंडो फार्मचा IPO पहिल्याच दिवशी 17 पट सबस्क्राइब, GMP कितीवर?
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Kej Hospital : खांद्यावर गमछा, कॅमेरासमोर जोडले हात; वाल्मिक कराड केज रुग्णालयातAshok Kamble on Walmik Karad : वाल्मिक कराडचे इन्काउंटर करा, अशोक कांबळेंची खळबळजनक मागणीWalmik Karad Car Pune : 'या' कारमधून वाल्मिक कराड पुणे CID कार्यालयात शरणABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 31 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
IPO Update : यूनिमेक एअरोस्पेसनं शेवट गोड केला, 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, गुंतवणूकदारांचं लक्ष इंडो फार्मच्या आयपीओकडे, GMP कितीवर?
यूनिमेक एअरोस्पेसचा आयपीओ 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, इंडो फार्मचा IPO पहिल्याच दिवशी 17 पट सबस्क्राइब, GMP कितीवर?
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण  कॅमेऱ्यात कैद
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी सोडवणार पेपर
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी सोडवणार पेपर
RBI Rule : नववर्षातील पहिला धक्का, 1 जानेवारीपासून तीन प्रकारची बँक खाती बंद होणार, आरबीआयचा मोठा निर्णय, कारण समोर
नववर्षातील पहिला धक्का, 1 जानेवारीपासून तीन प्रकारची बँक खाती बंद होणार, आरबीआयचा मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
Embed widget