एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Lakshya Sen Rewarded: कर्नाटक सरकारकडून लक्ष्य सेनला पाच लाखांचं बक्षीस जाहीर

Lakshya Sen Rewarded: मुख्यमंत्र्यांनी युवा सक्षमीकरण आणि क्रीडा विभागातर्फे आयोजित 'मिनी-ऑलिम्पिक स्पोर्ट्स मीट-2022' चे उद्घाटन केल्यानंतर ही घोषणा केली.

Lakshya Sen Rewarded: थॉमस चषक (Thomas Cup 2022) जिंकणाऱ्या भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाचा सदस्य लक्ष्य सेनला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी सोमवारी राज्य सरकारकडून 5 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केलं. मुख्यमंत्र्यांनी युवा सक्षमीकरण आणि क्रीडा विभागातर्फे आयोजित 'मिनी-ऑलिम्पिक स्पोर्ट्स मीट-2022' चे उद्घाटन केल्यानंतर ही घोषणा केली. आपले सरकार सर्व खेळांना प्रोत्साहन देत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

बोम्मई म्हणाले की, " 2024 मध्ये पॅरिस ऑलिम्पिकची स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेच्या तयारीचा भाग म्हणून आम्ही विविध खेळांतील 75 खेळाडूंच्या गटाची विशेष प्रशिक्षणासाठी निवड केली आहे. थॉमस चषकाच्या अंतिम सामन्यात भारतानं 14 वेळा चॅम्पियन ठरलेल्या इंडोनेशियाला 3-0 च्या फरकानं पराभूत करून थॉमस चषकावर पहिल्यांदाच नाव कोरलं.

एएनआयचं ट्वीट- 

73 वर्षानंतर भारतानं थॉमस चषक जिंकला
आतापर्यंत इंडोनेशियानं सर्वाधिक 14 वेळा, चीननं 10 वेळा, मलेशियानं 5 वेळा तर, जपान आणि डेन्मार्क यांनी एक-एक वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. ज्यानंतर यंदा 2022 साली भारताने या स्पर्धेत चॅम्पियन इंडोनेशियाला मात देत इतिहास घडवला आहे. त्यामुळे ही स्पर्धा जिंकणारा भारत जगातील सहावा देश बनला आहे. या स्पर्धेत भारतीय बॅडमिंटन संघानं सुरुवातीपासून उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांनी आधी डेन्मार्कला सेमीफायनलमध्ये मात दिल्यानंतर अंतिम सामन्यात इंडोनेशियाला सुरुवातीच्या तीन सामन्यात मात दिली.

भारताच्या विजयाच्या शिल्पकार
या स्पर्धेतील पहिला सामना पुरुष एकेरीत लक्ष्य सेननं जिंकला. त्याने इंडोनेशियाच्या अँथॉनी गिंटिंगचा 8-21, 21-17 आणि 21-16 असा पराभव केला. त्यानंतर पुरुष दुहेरी सामन्यात भारतीय बॅडमिंटनपटू जोडी सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीने इंडोनेशियाच्या मुहम्मद एहसान आणि केविन संजया यांना 18-21, 23-21, 21-19, अशा फरकानं मात दिली. ज्यानंतर तिसऱ्या सामन्यात किंदम्बी श्रीकांतनं (kidambi srikanth) इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीला 21-15, 22-21 च्या फरकानं मात देऊन चषकावर नाव कोरलं.

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amol Khatal : बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज नेत्याला पाडलं, अमोल खताळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सुजय विखेंच्या पराभवाचा बदला...
बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज नेत्याला पाडलं, अमोल खताळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सुजय विखेंच्या पराभवाचा बदला...
Amol Khatal : 40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
Eknath Shinde Shivsena : सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Seat Sharing : कसा असेल नव्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला?  ABP Majha कडे EXCLUSIVETop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 1 PM : 24 नोव्हेंबर  2024: ABP MajhaManoj Jarange Full PC : सरकारने बेईमानी केली तर त्यांना गुडघ्यावर आणू - मनोज जरांगेAmol Mitkari Full PC : जयंत पाटलांबाबत वाईट वाटतं; प्रमाणपत्र घ्यायलाही गेले नाहीत - अमोल मिटकरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amol Khatal : बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज नेत्याला पाडलं, अमोल खताळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सुजय विखेंच्या पराभवाचा बदला...
बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज नेत्याला पाडलं, अमोल खताळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सुजय विखेंच्या पराभवाचा बदला...
Amol Khatal : 40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
Eknath Shinde Shivsena : सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
Ajit Pawar: मावळ पॅटर्न उद्ध्वस्त करणारे सुनील शेळके कसे जिंकले, मोदींसोबतच्या भेटीचा किस्सा दादांनी सांगितला, तटकरेंनी गालगुच्चा घेतला
मावळ पॅटर्न उद्ध्वस्त करणारे सुनील शेळके कसे जिंकले, मोदींसोबतच्या भेटीचा किस्सा दादांनी सांगितला, तटकरेंनी गालगुच्चा घेतला
मोठी बातमी: महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
Praniti Shinde : स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
Embed widget