एक्स्प्लोर

BCCI on Thomas Cup Win : 14 वेळा चॅम्पियन इंडोनेशियाला मात देत भारतानं जिंकला थॉमस कप, शुभेच्छांचा वर्षाव, बीसीसीआयनंही केलं ट्वीट

Team India : तब्बल 73 वर्षानंतर भारत थॉमस कपच्या (Thomas Cup) अंतिम सामन्यात पोहोचलेल्या भारतीय संघाने इंडोनेशियाला मात देत इतिहास रचला आहे.

India Win Thomas Cup 2022 : बॅडमिंटन विश्वातील एक मानाची आणि अत्यंत जुनी अशी स्पर्धा असणाऱ्या थॉमस कपमध्ये (Thomas Cup) भारतानं इंडोनेशिया संघाला मात देत विजयश्री मिळवला आहे. भारताने मिळवलेल्या या विजयानंतर सर्वच स्तरातून भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे.

संपूर्ण देशाला तुमचा अभिमान

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) यांनीही भारतीय बॅडमिंटन संघाचं अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. बीसीसीआयने बॅडमिंटन इंडिया असोसिएशनचं ट्वीट शेअर करत भारतीय बॅडमिंटन संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. ही एक ऐतिहासिक कामगिरी असून संपूर्ण देशाला तुमचा अभिमान वाटत आहे, असं कॅप्शन बीसीसीआयने दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू इत्यांदीनी देखील भारतीय बॅडमिंटन संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

 

भारताचा पहिला वहिला विजय

आतापर्यंत सर्वाधिक 14 वेळा इंडोनेशियाने, 10 वेळा चीनने, मलेशियाने 5 वेळा तर जपान आणि डेन्मार्क यांनी एक-एक वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. ज्यानंतर यंदा 2022 साली भारताने या स्पर्धेत चॅम्पियन इंडोनेशियाला मात देत पहिलं वहिला चषक मिळवला आहे. त्यामुळे ही स्पर्धा जिंकणार भारत जगातील सहावा देश बनला आहे. यंदा भारतीय बॅडमिंटन संघाने सुरुवातीपासून अप्रतिम कामगिरी सुरु ठेवली. त्यांनी आधी डेन्मार्कला सेमीफायनलमध्ये मात दिल्यानंतर अंतिम सामन्यात इंडोनेशियाला सुरुवातीच्या तीन सामन्यात मात दिली.

यावेळी सर्वात आधी स्पर्धेतील पहिला सामना पुरुष एकेरीत लक्ष्य सेनने (Lakshya Sen) जिंकला. त्याने इंडोनेशियाच्या अँथॉनी गिंटिंगचा 8-21, 21-17 आणि 21-16 असा पराभव केला. त्यानंतर पुरुष दुहेरी सामन्यात भारतीय बॅडमिंटनपटू जोडी सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीने इंडोनेशियाच्या मुहम्मद एहसान आणि केविन संजया यांना 18-21, 23-21, 21-19, अशा फरकाने मात दिली. ज्यानंतर तिसऱ्या सामन्यात किंदम्बी श्रीकांतने (kidambi srikanth) इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीला 21-15, 22-21 च्या फरकाने मात देत सामना आणि कप भारताच्या नावे केला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PBKS vs DC Live Update : श्रेयस अय्यर अन् प्रियांश आर्याची फटकेबाजी; पंजाब किंग्सचे दिल्लीसमोर 211 धावांचे आव्हान
PBKS vs DC IPL 2026 Live Update : श्रेयस अय्यर अन् प्रियांश आर्याची फटकेबाजी; पंजाब किंग्सचे दिल्लीसमोर 211 धावांचे आव्हान
Tim David News : LIVE कॅमेऱ्यात कैद झाली टीम डेव्हिडची लाजिरवाणी हरकत; व्हिडीओ व्हायरल होताच BCCI अ‍ॅक्शन मोडमध्ये, नेमकं काय घडलं?
LIVE कॅमेऱ्यात कैद झाली टीम डेव्हिडची लाजिरवाणी हरकत; व्हिडीओ व्हायरल होताच BCCI अ‍ॅक्शन मोडमध्ये, नेमकं काय घडलं?
Mumbai Indians : मुंबई इंडियन्समध्ये पडली उभी फूट; रोहित-हार्दिक वाद पुन्हा चव्हाट्यावर? सोशल मीडियावर अफवांचा स्फोट
मुंबई इंडियन्समध्ये पडली उभी फूट; रोहित-हार्दिक वाद पुन्हा चव्हाट्यावर? सोशल मीडियावर अफवांचा स्फोट
BCCI Fined RCB coach Andy Flower : RCBच्या विजयानंतरही मोठा धक्का! हेड कोच फ्लॉवरवर कारवाई, कारण ऐकून चाहत्यांनाही धक्का, नेमकं काय घडलं?
RCBच्या विजयानंतरही मोठा धक्का! हेड कोच फ्लॉवरवर कारवाई, कारण ऐकून चाहत्यांनाही धक्का, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट
Kolhapur Fuel Issue : मोदींकडून पेट्रोल-डिझेल कमी वापरण्याचे आवाहन, कोल्हापूरकर म्हणाले...
Mateen Patel Case : मतीन पटेलांचं नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू - महापौर संभाजीनगर
Nitesh Rane On Nida Khan Case : निदा खान हिला पाठिशी घालण्याचं काम MIM पक्षाकडून सुरु आहे
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
आगामी काळात मोठी महागाई, जितेंद्र आव्हाडांचे भाकीत; मोदींच्या आवाहनानंतर ठाकरेंच्या खासदारांचाही संताप
आगामी काळात मोठी महागाई, जितेंद्र आव्हाडांचे भाकीत; मोदींच्या आवाहनानंतर शिवसेना ठाकरेंच्या खासदारांचाही संताप
Embed widget