आयपीएल लिलावात खरेदीदार न मिळाल्याने इरफान भावूक

‘’माझ्या पाठीला 2010 मध्ये 5 ठिकाणी फ्रॅक्चर असल्याचं समजलं. मी परत कधीच क्रिकेट खेळू शकत नाही,
क्रिकेटचं स्वप्न विसरुन जावं, असं मला डॉक्टरांनी सांगितलं होतं.
पण मी डॉक्टरांना सांगितलं की, मी कोणताही त्रास सहन करायला तयार आहे.
पण देशासाठी खेळता येतं, तो हा खेळ सोडण्याचा त्रास नाही सहन करु शकत.
मी कठिण मेहनत केली आणि पुन्हा संघात पुनरागमन केलं.
करिअरमध्ये अनेक संकटांचा सामना केला. पण कधीच पराभव पत्करला नाही.
हा माझा स्वभाव आहे, मी असंच करायला पाहिजे आणि असंच करीन.
आताही हा माझ्यासमोरचा अडथळा आहे.
पण चाहत्यांच्या आशीर्वाद आणि शुभेच्छांनी पुन्हा मी हा अडथळा पार करीन.
मला पाठिंबा देणाऱ्या माझ्या चाहत्यांना मला ही गोष्ट शेअर करायची होती.’’























