एक्स्प्लोर
आणखी वाट पाहू शकत नाही : विराट कोहली
मुंबई: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली उजव्या खांद्याच्या दुखापतीतून सावरला असून, आयपीएलमधल्या शुक्रवारच्या सामन्यात तो क्रिकेटच्या मैदानात पुनरागमनासाठी सज्ज असल्याचं कळतं.
आयपीएलच्या रणांगणात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांमधला सामना शुक्रवार, 14 एप्रिल रोजी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.
या सामन्यात आपण खेळण्याची शक्यता असल्याचे संकेत विराटनं सोशल मीडियावर दिले आहेत.
त्यानं जिममध्ये वेटलिफ्टिंग करतानाचा आपला व्हिडियोही सोबत पोस्ट केला आहे. सदर व्हिडीओत विराट ज्या सहजतेनं वजन उचलतो ते पाहता तो खांद्याच्या दुखापतीतून सावरल्याचा त्यातून संकेत मिळतो.
या व्हिडियोसोबतच्या आपल्या संदेशात विराट म्हणतो की, मी मैदानात उतरण्याची आता आणखी प्रतीक्षा करू शकत नाही. तो दिवस आता जवळ आला आहे का????? 14 एप्रिल? विराटच्या पोस्टनं त्याच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलणं स्वाभाविक आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement