Yuvraj Singh : 'या' 24 वर्षी खेळाडूला कसोटी संघाचा कर्णधार करता येईल, युवराज सिंहने केली मागणी
मागील काही काळापासून भारतीय संघातील कर्णधारपदावरुन मोठे वाद होत असताना आता युवराजने एका युवा खेळाडूचं नाव भविष्यातील कसोटी कर्णधार म्हणून सूचवलं आहे.
Indian Test Team Captain : मागील बराच काळ भारतीय संघाचा कर्णधार असणाऱ्या विराटची या जबाबदारीतून मुक्तता झाल्यानंतर भारतीय संघाचा पुढील कर्णधार कोण? या चर्चा सुरु होत्या. मर्यादीत षटकांसाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) याचं नाव निश्चित असलं तरी कसोटी संघाचा कर्णधार कोण? हा प्रश्न अजूनही आहेच. दरम्यान माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंह (Yuvraj Singh) याने यासाठी 24 वर्षीय क्रिकेटर ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या नावाचं समर्थन केलं आहे. त्याने ऋषभ पंतला कसोटी संघाचा उपकर्णधार करण्याची मागणी केली आहे. जेणेकरुन तो भविष्यात भारतीय संघाचा कर्णधार होऊ शकतो. त्याने यावेळी धोनीचं उदाहरण देखील दिलं असून सध्या या जबाबदारीसाठी पंत योग्य खेळाडू असल्याचंही तो म्हणाला.
पंतला कर्णधार करण्याबाबत युवराज म्हणाला, 'महेंद्र सिंह धोनी एक उत्तम कर्णधार होता. कारण एक विकेटकीपर संपूर्ण खेळाला योग्यरितीने समजू शकतो. त्याच्या मते सिलेक्टर्सनी देखील पंतला भविष्यासाठी तयार करायला हवं. तो युवा खेळाडू असून एक उत्तम कर्णधार बनू शकतो. त्यात विकेटकिपर असल्याने त्याचं लक्ष संपूर्ण मैदानावर असेल ज्याचा त्याला आणि संघाला फायदा होईल.
'विराटलाही अशीच मिळाली होती जबाबदारी'
पंतच्या अनुभवाबद्दल बोलताना युवराज म्हणाला, विराट कोहलीली जेव्हा कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली होती. तेव्हा तो ही इतकाच परिपक्व होता.त्यामुळे पंतलाही जबाबदारी दिली जाऊ शकते. यावेळी युवराजने पंतची तुलना गिलख्रिस्टसोबत केली. गिलीने सात नंबरवर फलंदाजी करत 17 शतकं ठोकली. त्यात पंतनेही आतापर्यंत 4 दमदार शतकं ठोकल्याचं युवराजने सांगितलं. त्यामुळे पंत एक उत्तम पर्याय होऊ शकतो असं युवराज म्हणाला.
हे देखील वाचा-