ट्रेलब्लेजर्सने सामना जिंकला, पण पराभूत होऊनही व्हेलोसिटीची फायनलमध्ये धडक
Women's T20 Challenge 2022 : महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात ट्रेलब्लेजर्सने व्हेलोसिटीचा 16 धावांनी पराभव केला.
Velocity vs Trailblazers Women's T20 Challenge 2022 : महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात ट्रेलब्लेजर्सने व्हेलोसिटीचा 16 धावांनी पराभव केला. पण ट्रेलब्लेजर्सला फायनलमध्ये प्रवेश करता आला नाही. नेट रनरेटच्या जोरावार व्हेलोसिटीने फायनलमध्ये धडक मारली आहे. सुपरनोव्हास आणि व्हेलोसिटी यांच्यामध्ये फायनलची लढत होणार आहे.
ट्रेलब्लेजर्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 190 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना व्हेलोसिटीचा संघ 174 धावांपर्यंत पोहचला. ट्रेलब्लेजर्सकडून जेमिमाह रोड्रिगेजने दमदार अर्धशतक झळकावले. रोड्रिगेजने 66 धावांची खेळी केली. तर गोलंदाजीत पूनम यादवने भेदक मारा केला. पूनम यादवने दोन विकेट घेतल्या. राजेश्वरी गायकवाडलाही दोन विकेट मिळाल्या.
व्हेलोसिटीकडून शेफाली वर्माने 15 चेंडूत 29 धावांची खेळी केली. या डावात तिने पाच चौकार लगावले. किरण नवगीरेने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना धावांचा पाऊस पाडला. तिने महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेतील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले. किरण नवगीरेने अवघ्या 25 चेंडूत अर्धशतक झळकावले. किरण नवगीरेने या सामन्यात 34 चेंडूत पाच चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 69 धावांची खेळी केली. या सामन्यात कर्णधार दिप्तीला खास कामगिरी करता आली नाही. दिप्ती फक्त दोन धावा काढून बाद झाली. स्नेह राणाही 11 धावा काढून बाद झाली.
That's that from Match 3 of #My11CircleWT20C
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2022
Trailblazers win by 16 runs, but it is the Velocity who make it to the Finals on net run rate.
Scorecard - https://t.co/FLFvj1HDlk #VELvTBL #My11CircleWT20C pic.twitter.com/B5XSyEF80j
अखेरचा हंगाम -
महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेला महिलांचं खेळाडूंचं आयपीएल म्हटलं जातं. परंतु, यंदाचं वर्ष महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेतील शेवटचं हंगाम असणार आहे. आतापर्यंत तीन वेळा महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. परंतु 2022 मध्ये ही स्पर्धा शेवटच्या वेळी आयोजित केली जात आहे. त्यामागचं कारण म्हणजे आयपीएलच्या धर्तीवर पुढील वर्षीपासून महिला आयपीएलचे आयोजन केलं जाणार आहे, ज्यात 6 संघ सहभागी होणार आहेत. भारतात महिला टी-20 चॅलेंजला यावर्षी चांगला प्रतिसाद मिळाला, ज्यावेळी बीसीसीआयनं सहा संघाची महिला आयपीएल स्पर्धा खेळवण्याचा प्रस्ताव ठेवला. दरम्यान, 2019 मध्ये केवळ एका सामन्यासह टी-20 चॅलेंज स्पर्धेला सुरुवात झाली. त्यानंतर 2019 आणि 2020 तीन संघाची स्पर्धा बनली.
हे देखील वाचा-