LSG Vs MI: लखनौविरुद्ध विचित्र पद्धतीनं बाद झाला इशान किशन, पाहून प्रेक्षकही झाले हैराण
Ishan Kishan: लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रविवारी आयपीएल 2022चा 37 वा सामना खेळण्यात आला.
Ishan Kishan: लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रविवारी आयपीएल 2022चा 37 वा सामना खेळण्यात आला. या सामन्यात लखनौच्या संघानं मुंबईला 36 धावांनी पराभूत केलं. सध्या सोशल मीडियावर ईशान किशनची जोरदार चर्चा सुरू आहे. यंदाच्या हंगामात ईशान किशनला काही खास कामगिरी करता आली नाही. परंतु, लखनौविरुद्ध सामन्यात तो ज्या पद्धतीनं आऊट झाला, हे पाहून मैदानातील प्रेक्षकही हैराण झाले. ईशान किशन आऊट झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
लखनौच्या संघानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या ईशान किशनला या सामन्यातही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. लखनौविरुद्ध सामन्यात त्यानं 20 चेंडू खेळून फक्त आठ धावा केल्या. ज्यामुळं नेटकऱ्यांनी त्याला धारेवर धरलं आहे. सध्या सोशल मीडियावर ईशान किशनचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात ईशान किशन विचित्र पद्धतीनं आऊट झाल्याचं पाहायला मिळतंय.
व्हिडिओ-
मुंबई इंडियन्सच्या डावाच्या आठव्या षटकात लखनौकडून रवी बिश्नोई गोलंदाजी करायला आला. रवी बिश्नोईच्या शॉर्ट बॉलवर ईशाननं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण बॅटला लागल्यानंतर चेंडू थेट यष्टिरक्षक क्विंटन डी कॉकच्या बुटाला लागून वर उडाला. त्यावेळी जवळच उभा असलेल्या जेसन होल्डरनं झेल पकडत त्याला माघारी धाडलं.
मुंबईचा 36 धावांनी पराभव
मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या 37 व्या सामन्यात लखनौच्या संघानं मुंबईला 36 धावांनी पराभूत केलं. या हंगामातील मुंबईच्या संघाचा सलग आठवा पराभव आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकत मुंबईच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लखनौच्या संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून मुंबईसमोर 169 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात मुंबईच्या संघाला 20 षटकात 8 विकेट्स गमावून 132 धावा करता आल्या.
हे देखील-
- PKBS Vs CSK: चेन्नईविरुद्ध धवन गाठणार विक्रमाचं 'शिखर', फक्त दोन धावा दूर
- PBKS Vs CSK Predicted Playing XI: पंजाब आणि चेन्नईच्या 'किंग्ज'मध्ये आज रंगणार सामना, अशी असू शकते दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन
- IPL Points Table: मुंबईच्या पराभवानंतर गुणतालिकेत मोठे बदल; गुजरात अव्वल स्थानी, इतर संघांची परिस्थिती काय?