PBKS Vs CSK Predicted Playing XI: पंजाब आणि चेन्नईच्या 'किंग्ज'मध्ये आज रंगणार सामना, अशी असू शकते दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन
PBKS Vs CSK Predicted Playing XI: आयपीएल 2022 च्या 38 व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज (Panjab Kings Vs Chennai Super Kings) आमने सामने येणार आहेत.
PBKS Vs CSK Predicted Playing XI: आयपीएल 2022 च्या 38 व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज (Panjab Kings Vs Chennai Super Kings) आमने सामने येणार आहेत. रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) चेन्नईच्या संघाचं नेतृत्व करत आहे. तर, मयांक अग्रवालकडं (Mayank Agrawal) पंजाबच्या संघाचं जबाबदारी सोपवण्यात आली आहे.आजच्या सामन्यात दोन युवा कर्णधार एकमेकांसमोर येणार आहेत. यंदाचा हंगाम दोन्ही संघासाठी चांगला ठरला नाही. या हंगामात चेन्नईला सात सामन्यात केवळ दोन विजय मिळवता आला आहे. तर, दुसरीकडं पंजाबच्या संघालाही काही खास कामगिरी करता आलेली नाही. पंजाबनं सातपैकी चार सामने गमावले आहेत.
पंजाब किंग्ज विरुद्ध सुपर किंग्ज हेड टू हेड
आयपीएलमध्ये आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यामध्ये 26 सामने झाले आहेत. यातील 15 सामन्यात चेन्नईच्या संघानं विजय मिळवला आहे. तर, पंजाबनं 11 सामने जिंकले आहेत. यंदाच्या हंगमात दोन्ही संघाची कामगिरी खराब झाली आहे. गुणतालिकेत पंजाबचा संघ आठव्या तर चेन्नईचा संघ नवव्य क्रमांकावर आहे. दोन्ही संघात एकापेक्षा एक दर्जेदार खेळाडूंचा भरणार आहे. गोलंदाजीही धारधार आहे. त्यामुळे सामना रंगतदार होणार यात शंकाच नाही. कोणताही खेळाडू दमदार कामगिरी करतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
कधी, कुठे पाहता येणार सामना?
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगणार आहे. पंजाब किंग्सआणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. महत्वाचं म्हणजे, वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल.
पंजाब किंग्सचा संभाव्य संघ:
मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टन, जितेश शर्मा (विकेटकिपर), शाहरुख खान, कागिसो रबाडा, नॅथन एलिस, राहुल चहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंह.
चेन्नई सुपर किंग्सचा संभाव्य संघ:
ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रविंद्र जडेजा (कर्णधार), एमएस धोनी (विकेटकीपर), ड्वेन प्रिटोरियस, ड्वेन ब्रावो, मिचेल सेंटनर, महेश तिक्षणा, मुकेश चौधरी.
हे देखील वाचा-