Wasim Jaffer: टी-20 विश्वचषकासाठी वसीम जाफरनं निवडला भारताचा संघ, 'या' खेळाडूंना संघात स्थान
Wasim Jaffer: आयपीएलनंतर 2022 नंतर भारतीय संघाला ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणार आगामी टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2022) खेळायचा आहे.
Wasim Jaffer: आयपीएल 2022 नंतर भारतीय संघाला ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणार आगामी टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2022) खेळायचा आहे. गेल्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघानं निराशाजकन कामगिरी करून दाखवली होती. या विश्वचषकात भारताला पाकिस्तान आणि न्यूझीलंडसारख्या संघांकडून पराभव पत्करावा लागल्यानं स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं होतं. टी-20 विश्वचषकापूर्वी भारताला आशिया चषकही (Asia Cup) खेळायचा आहे. दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफरनं (Wasim Jaffer) टी-20 विश्वचषक आणि आशिया चषकस्पर्धेसाठी भारताचा प्लेईंग इलेव्हन संघ निवडला आहे. जाफरनं या दोन मोठ्या स्पर्धांसाठी हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, हर्षल पटेल आणि भुवनेश्वर कुमार या खेळाडूंना आपल्या प्लेइंग इलेव्हनचा भाग बनवलं आहे.
वसीम जाफर काय म्हणाला?
दरम्यान, जाफरनं 'नॉट जस्ट क्रिकेट' या शोमध्ये म्हणाला की, जे खेळाडू टी-20 विश्वचषकाच्या शर्यतीतून बाहेर आहेत, अशा खेळाडूंना आशिया चषकात समावेश करण्याची शक्यता कमी आहे. कोणताही बदल न करता तुम्हाला पाठिंबा द्यावा लागेल. शमी आणि दीपक चहर यांच्यामध्ये मोहम्मद हा पर्याय असेल. त्यांनी बॅकअप पर्याय म्हणून पृथ्वी शॉचीही निवड केली आहे.
आशिया चषक आणि T20 विश्वचषकासाठी वसीम जाफरची प्लेइंग इलेव्हन:
केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह.
हे देखील वाचा-