VIDEO : उमरान मलिकच्या घातक चेंडूमुळे मयंकला दुखापत, म्हणाला 'आता एक्स-रे काढावा लागेल'
SRH vs PBKS: उमरान मलिक हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान भारतीय गोलंदाज ठरत असून त्याने यंदाच्या सर्वात वेगवान गोलंदाजी केली आहे.
Umran Malik and Mayank Agarwal : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेतील अखेरच्या लीग सामन्यात पंजाबने हैदराबादवर 5 विकेट्सनी विजय मिळवला. या सामन्यात उमरान मलिकच्या तुफानी वेगाची पुन्हा एकदा सर्वांना प्रचिती आली. उमरान पंजाबचा कर्णधार मयांक अगरवालसमोर गोलंदाजी करत असताना त्याने एक भेदक डिलेव्हरी केली, ज्यावेळी चेंडू थेट मयांकच्या पोटाच्या काहीसा वरच्या बाजूला लागून गेला. उमरानची गोलंदाजी अत्यंत भेदक असल्याने मयांकला हा चेंडू बराच जोरात लागला. त्यामुळे सामन्यानंतर बोलताना मयांक 'आता मला एक्स रे काढावा लागेल' असंही म्हणाला.
प्रथम फलंदाजी करत हैदराबाद संघाने 158 धावांचे लक्ष्य पंजाबसमोर ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना उमरान सातवं षटक टाकत होता. यावेळी तिसऱ्या चेंडूवर त्याने शाहरुख खानला तंबूत धाडलं. त्यानंतर कर्णधार मयांक अगरवाल क्रिजवर आला. यावेळी उमरान मलिकने एक तुफान असा 143.2 किमी प्रतितासाच्या वेगाने चेंडू फेकला. हा चेंडू थेट मयांकला पोटाच्या काहीसा वरच्या बाजूस लागला. ज्यानंतर मयांक थेट जमिनीवर झोपून गेला, यावेळी फिजीओही मैदानावर आले. दरम्यान या सर्वानंतर सामना पार पडल्यावर मयांकला याबाबत विचारलं असता मला आता एक्स-रे काढावा लागेल, असं मयांक म्हणाला.
उमरानची आयपीएल 2022 मधील कामगिरी
आयपीएल 2022 मध्ये उमरानने त्याच्या तुफान वेगाने सर्वांनाच आश्चर्यचकीत करुन सोडलं. त्याने गुजरातविरुद्ध एका सामन्यात तब्बल 5 गडी बाद करत विशेष कामगिरी केली. हंगामातील 14 सामन्यात उमरानने 21 विकेट्स घेत पर्पल कॅपच्या शर्यतीतही चांगली कामगिरी केली. याशिवाय आयपीएल 2022 मध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम गुजरात टायटन्सचा गोलंदाज लॉकी फर्ग्युसनच्या नावावर होता. त्यानं चेन्नईविरुद्ध सामन्यात 153.9 किमी प्रतितासानं चेंडू टाकला होता. परंतु, त्यानंतर उमरान मलिकनं 154 किमी प्रतितास वेगानं चेंडू टाकत हा रेकॉर्ड तोडला. त्यानंतर 5 मे रोजी दिल्लीविरुद्ध तब्बल 157 किमी प्रतितासानं चेंडू टाकत उमराननं स्वत:चाच रेकॉर्ड तोडला. दुसरीकडे संघात पहिल्यांदाच स्थान मिळालेल्या अर्शदीपने यंदा 14 सामन्यात 10 विकेट्स घेतल्या आहेत.
हे देखील वाचा-