IPL Final 2024: हेडपासून स्टार्कपर्यंत, हे 10 खेळाडू ठरतील गेमचेंजर, तुम्ही व्हाल मालामाल
IPL Final 2024 KKR vs SRH Top Players Stats : कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यामध्ये आज आयपीएलचा महाअंतिम सामना होत आहे.
IPL Final 2024 KKR vs SRH Top Players Stats : कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यामध्ये आज आयपीएलचा महाअंतिम सामना होत आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर दोन्ही संघ चषकासाठी भिडणार आहे. या सामन्यावेळी अनेकजण फॅन्टेसी संघ तयार करतील. प्लेईंग 11 तयार करताना कोणत्या खेळाडूंना घ्यायचं, याबाबत अनेकजण संभ्रमात असतील. तर 10 खेळाडूंबद्दल माहिती सांगणार आहोत, जे संघात असतील तर तुम्ही मालामाल होऊ शकता. 2024 आयपीएल फायनलमध्ये गेमचेंजर ठरणाऱ्या खेळाडूबद्दल पाहूयात..
कोलकाता नाईट रायडर्सचे पाच खेळाडू
1- सुनील नारायण -
कोलकाता नाईट रायडर्ससाठी सुनील नारायण यानं अष्टपैलू कामगिरी केली आहे. त्याने गोलंदाजी आणि फलंदाजीत अमुलाग्र योगादान दिलेय. फलंदाजीसाठी तो सलामीला येऊन चौकार आणि षटकारांचा पाऊस पडतो, तर गोलंदाजीत भेदक मारा करत विकेट घेतो. नारायम यानं यंदाच्या हंगामात फलंदाजी करताना 37.8 च्या सरासरीने आणि 180 च्या स्ट्राईक रेटने 482 धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीमध्ये 22 च्या सरासरीने 22 विकेट घेतल्या आहेत.यंदाच्या हंगामात नारायणच्या नावावर एक शतक आणि तीन अर्धशतके आहेत. आजच्या सामन्यातही तो गेमचेंजर ठरेल.
2- आंद्रे रसेल
अष्टपैलू आंद्रे रसेल याला यंदाच्या हंगामात तितकी संधी मिळाली नाही, पण तो नक्कीच गेमचेंजर ठरु शकतो. रसेल एकहाती सामना फिरवू शकतो. त्याने यंदाच्या हंगामात 32 च्या सरासरीने आणि 185 च्या स्ट्राईक रेटने 222 धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीत त्याने 16 विकेट घेतल्या आहेत.
3- मिचेल स्टार्क
डावखुरा मिचेल स्टार्क सुरुवातीच्या टप्प्यात अतिशय महागडा ठरला. पण त्यानंतर त्याने शानदार कमबॅक केलेय. हैदराबादविरोधात झालेल्या क्वालिफायर 1 सामन्यात स्टार्क यानं भेदक मारा केला होता. स्टार्कने 4 षटकात 34 धावांच्या मोबदल्यात तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता. स्टार्कने आयपीएल 2024 मध्ये 26 च्या सरासरीने 15 विकेट घेतल्या आहेत. फायनलमध्ये तो कोलकात्यासाठी गेमचेंजर ठरु शकतो.
4- हर्षित राणा
आयपीएल 2024 मध्ये हर्षित राणा याने आपल्या स्लोअर गोलंदाजीने प्रतिस्पर्धी फलंदाजांना चकवा दिला. कोलकात्यासाठी हर्षित हुकूम का एक्का ठरला. हर्षित राणा याने आतापर्यंत 21 च्या सरासरीने 17 विकेट घेतल्या.
5- वरुण चक्रवर्ती
फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती याच्यापुढे प्रतिस्पर्धी फलंदाजांना भंबेरी भरली. वरुण चक्रवर्तीच्या फिरकीच्या जाळ्यात अनेकजण फसलेत. त्याने आयपीएल 2024 मध्ये 19 च्या सरासरीने 20 विकेट घेतल्या आहेत.
हैदराबादसाठी गेमचेंजर ठरणारे पाच खेळाडू
1- ट्रेविस हेड
हैदराबादचा सलामी फलंदाज ट्रेविस हेड याने आतापर्यंत आक्रमक फलंदाजी केली आहे. हेडसमोर प्रतिस्पर्धी गोलंदाजांना धडकी भरते. हेड याने आतापर्यंत 44 च्या सरासरीने 192 च्या स्ट्राईक रेटने 567 धावा चोपल्या आहेत. यादरम्यान त्याने एक शतक आणि पाच अर्धशतके ठोकली आहेत.
2- अभिषेक शर्मा
हेड आणि अभिषेक शर्मा याने हैदराबादला आक्रमक सुरुवात दिली. अभिषेक शर्मा याने यंदाच्या हंगामात सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. अभिषेक शर्मा याने 34.43 च्या सरासरीने 482 धावा चोपल्या आहेत. अभिषेक शर्माच्या बॅटमधून तीन अर्धशतके निघाली आहेत.
3- हेनरिक क्लासेन
विकेटकीपर फलंदाज हेनरिक क्लासेन याने हैदराबादसाठी विस्फोटक फलंदाजी केली. क्लासेन याने फिरकी आणि वेगवान माऱ्याचा समाचार घेतला. त्याने 42 च्या सरासरीने आणि 176 च्या स्ट्राईक रेटने 463 धावा चोपल्या आहेत. यादरम्यान त्याने 4 अर्धशतके ठोकली आहे. क्लासेन याने 18 चौकार आणि 38 षटकार ठोकले आहेत.
4- शाहबाज अहमद
ऑलराउंडर शाहबाज अहमद याने गोलंदाजी आणि फलंदाजीत चमकदार योगदान दिलेय. फलंदाजीत त्याने 25 च्या सरासरीने आणि 131 च्या स्ट्राईक रेटने 207 धावा केल्या आहेत. त्याशिवाय सहा विकेटही घेतल्या आहेत. क्वालिफायर 2 मध्ये शाहबाज अहमद याने भेदक मारा केला होता. चेपॉकच्या खेळपट्टीवर तो गेमचेंजर ठरु शकतो.
5- भुवनेश्वर कुमार
स्विंगचा राजकुमार भुवनेश्वर कुमार यानं आतापर्यंत भेदक मारा केलाय. पॉवरप्लेमध्ये विकेट घेण्याची त्याचमध्ये क्षमता आहे. स्पर्धेत आतापर्यंत त्याने 11 विकेट घेतल्या आहेत.