GT vs RR : हार्दिक पांड्याचा खतरनाक थ्रो; स्टम्पचे दोन तुकडे, सॅमसनचा धमाकेदार विकेट
IPL 2022 GT vs RR : गुजरात (GT) आणि राजस्थान (RR) यांच्यात झालेल्या सामन्यात हार्दिक पांड्याने संजू सॅमसनला धावबाद केले. संजूच्या धावबादबरोबरच मधला स्टंपही तुटला.
IPL 2022 GT vs RR : गुजरात टायटन्सविरुद्धच्या (GT) सामन्यात राजस्थान रॉयल्सला (RR) 37 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) अवघ्या 11 धावावर बाद झाला. त्याला हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) धावबाद केलं. यावेळी पांड्याने केलेला थ्रो इतका वेगवान होता की त्यामुळे स्टंमचे दोन तुकडे झाले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेत गुजरातने राजस्थानसमोर 193 धावांचे लक्ष्य उभं केलं. प्रत्युत्तरादाखल संजू सॅमसन संघाकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. यादरम्यान त्याने 11 चेंडूत 11 धावा केल्या. आठव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर संजू धाव घेण्यासाठी धावला. त्याचवेळी काही अंतरावर उभ्या असलेल्या पांड्याने चेंडू वेगाने स्टंपच्या दिशेने फेकला. हा थ्रो इतका वेगवान होता की संजू धावबाद झालाच त्याचबरोबर मधल्या स्टंमचेही दोन तुकडे झाले.
Hardik pandya Run out Sanju Samson and broken costly stump with lovely throw!
— Rahulsarsar (@Rahulsarsar177) April 14, 2022
Hardik is now Orange Cap Holder now
Scored 87* not out ( man of the match) #GTvsRR #HardikPandya #IPL2022 pic.twitter.com/Qwdf4luXNb
या सामन्यात गुजरातने 20 षटकांत 192 धावा केल्या. यावेळी हार्दिकने नाबाद 87 धावांची दमदार खेळी केली. अभिनव मनोहरनेही 43 धावांचे योगदान दिले. तर मिलरने नाबाद 31 धावा केल्या. 193 धावांचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ केवळ 155 धावा करू शकला. राजस्थानकडून जोस बटलरने 54 धावांची महत्त्वाची खेळी खेळली. हेटमायरने 29 धावा केल्या. त्याने 17 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकार ठोकला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- IPL 2022, RR vs GT: हार्दिक पांड्याचं वादळी अर्धशतक, लॉकी फर्गुसन-यश दयाल यांचा भेदक मारा, राजस्थानचा 37 धावांनी पराभव
- KKR vs SRH : हैदराबादसमोर कोलकात्याचं आव्हान, कोण मारणार बाजी?
- Indigo Flight : हवेत झेपावलेल्या विमानात प्रवाशाच्या फोनला अचानक आग, अन्...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha