(Source: ECI/ABP News/ABP Majha)
SRH vs CSK : धोनी पुन्हा कर्णधार, अशी असेल चेन्नई-हैदराबादची प्लेईंग 11
SRH vs CSK IPL 2022 Marathi News : रविवारी आयपीएलच्या चाहत्यांना मनोरंजनाचा डबल डोस असणार आहे.
SRH vs CSK IPL 2022 Marathi News : रविवारी आयपीएलच्या चाहत्यांना मनोरंजनाचा डबल डोस असणार आहे. दुपारी दिल्ली आणि लखनौ संघाचा सामना आहे. तर संध्याकाळी साडेसात वाजता हैदराबाद आणि चेन्नई यांची लढत होणार आहे. रवींद्र जाडेजाने कर्णधारपद सोडल्यानंतर पुन्हा एकदा चेन्नईची धुरा धोनीच्या खांद्यावर आली आहे. रविवारी सायंकाळी चेन्नईचा संघ धोनीच्या नेतृत्वात खेळताना दिसेल. चेन्नईच्या संघात काही बदल होण्याची शक्यता आहे.
आतापर्यंतची कामगिरी -
यंदाच्या हंगामात चेन्नईची सुरुवात खराब झाली आहे. चेन्नईच्या संघाला आठ सामन्यात फक्त दोन विजय मिळवता आलेत. चेन्नईचा संघ नवव्या क्रमांकावर आहे. तर हैदराबादच्या संघाने आठ सामन्यात लागोपाठ पाच विजय मिळवले आहेत. हैदराबादचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे.
हेड टू हेड -
रविवारी रात्री 7.30 वाजता सनराइजर्स हैदराबाद (SRH) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात IPL 2022 यंदाच्या हंगामात 46वा सामना होणार आहे. इतिहासात चेन्नई आणि हैदराबादचा संघ 17 वेळा आमने सामने आळाय. यामध्ये चेन्नईच्या संघाने 12 वेळा बाजी मारली आहे. तर सनराइजर्स हैदराबाद (SRH) संघाला पाच वेळा विजय मिळालाय.
चेन्नई सुपर किंग्सची (CSK) संभावित प्लेईंग 11
रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायडू, शिवम दुबे, रविन्द्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), ड्वेन प्रीटोरियस, ड्वेन ब्रॉवो, महेश चौधरी, महेश तीक्ष्णा
सनराइजर्स हैदराबाद (SRH) ची संभावित प्लेइंग 11
केन विलियमसन (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मारक्रम, निकोलस पूरन, शशांक सिंह, वॉशिंगटन सुंदर, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन, मार्को जानसेन, उमरान मलिक
पिच रिपोर्ट -
सनराइजर्स हैदराबाद (SRH) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यातील सामना पुण्यातील एमसीए मैदानावर होणार आहे. या मैदानावर वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. फलंदाजीला पोषक मैदान असेल. दव पडण्याची शक्यता नाही. त्यामुळे सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे.