Kieron Pollard : आयपीएलमधून निवृत्तीनंतरही पोलार्ड मुंबई इंडियन्ससोबत कायम, नव्या भूमिकेत दिसणार
Pollard in IPL 2023 : वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू कायरन पोलार्डला मुंबई इंडियन्सने खेळाडू म्हणून रिलीज केलं असलं तरी एक नवी जबाबदारी त्याच्यावर सोपवली आहे.
Kieron Pollard in Mumbai Indians : टी20 क्रिकेटमधील (T20 Cricket) एक दिग्गज अष्टपैली क्रिकेटर असणाऱ्या कायरन पोलार्ड (Kieron Pollard) आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर आला इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधून देखील निवृत्ती जाहीर केली आहे. पोलार्डला मुंबई इंडियन्सने आगामी आयपीएल 2023 पूर्वी रिलीज केलं असून त्यानंतर त्याने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे, पण असं असतानाही तो अजूनही मुंबई इंडियन्स संघासोबतच राहणार असून तो मुंबईच्या फलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. पोलार्डने निवृत्ती घेताना शेअर केलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्याने याबाबतची माहिती दिली आहे. आपल्या स्टार खेळाडूला आता कोचिंग देताना पाहणं मुंबई संघासह चाहत्यांसाठी एक खास अनुभव असणार आहे.
आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर पोलार्ड मुंबई इंडियन्सचा फलंदाजी प्रशिक्षक असणारच आहे, पण याशिवाय त्याच्याकडे आणखी एक जबाबदारी असेल. तो UAE मध्ये होणाऱ्या T20 लीगमध्येही मुंबई संघाकडून खेळताना दिसणार आहे. UAE च्या T20 लीगमध्ये MI Emirates नावाचा संघ मुंबई इंडियन्सचाच भार असून त्यामध्ये पोलार्ड खेळताना दिसणार आहे. पोलार्डने आयपीएलमधूनच निवृत्ती घेतली आहे, याचे कारण मुंबईने त्याला रिलीज केलं असून त्याला मुंबईशिवाय इतर कोणत्याही संघाकडून खेळायचं नाही.
12 वर्षे मुंबईसोबत आहे पोलाार्ड
2010 च्या आयपीएलमध्ये पोलार्डसोबत जोडला गेल्यानंतर तेव्हापासून पोलार्ड मुंबई संघासोबतच आहे. त्याने 171 डावात 3 हजार 412 धावा केल्या. आयपीएलमध्ये पोलार्डची फलंदाजीची सरासरी 28.67 होती, तर त्याच्या कारकिर्दीत स्ट्राईक-रेट 147.32 इतका होता. 16 अर्धशतके झळकावणाऱ्या पोलार्डला लीगमधील सर्वोत्तम फिनिशर मानले जाते. एका दशकाहून अधिक काळ मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सर्वात सातत्यपूर्ण नाव असलेल्या पोलार्डने मागील हंगामात खास कामगिरी केली नाही. त्याने 11 सामन्यांत 14.40 च्या खराब सरासरीने केवळ 144 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेटही केवळ 107.46 होता. ज्यानंतर आता त्याने निवृत्ती जाहीर केली आहे. पोलार्डच्या निवृत्तीनंतर मुंबई इंडियन्सनेही खास फोटो शेअर करत पोलार्डला शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
हे देखील वाचा-