एक्स्प्लोर

Yuvraj Singh XI for T20 World Cup :  युवराज सिंहच्या प्लेईंग 11 मध्ये संजूला स्थान नाही, कुणाकुणाचा समावेश?

Yuvraj Singh XI for T20 World: विश्वचषकात भारतीय संघाची प्लेईंग 11 कशी असेल? याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. विश्वचषक विजेता युवराज सिंह याने भारताची प्लेईंग 11 निवडली आहे

Yuvraj Singh XI for T20 World:  आगामी टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ लवकरच अमेरिकेला रवाना होणार आहे. भारताचा पहिला सामना 5 जून रोजी होणार आहे. तर 9 जून रोजी भारत पाकिस्तानसोबत भिडणार आहे. विश्वचषकात भारतीय संघाची प्लेईंग 11 कशी असेल? याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. विश्वचषक विजेता युवराज सिंह याने भारताची प्लेईंग 11 निवडली आहे. युवराजने आपल्या प्लेईंग 11 मध्ये विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन याला स्थान दिलेय. त्याचं कारणही त्याने सांगितलेय. युवराज सिंह याने आयसीसीसोबत बोलताना प्लेईंग 11 कशी असू शकते, याबाबत सांगितलेय. 

आघाडीचे फलंदाज कोण असतील? 

रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल डावाची सुरुवात करतील. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली फलंदाजीला उतरले. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली शानदार फलंदाजी करत आलाय. चौथ्या क्रमांकासाठी सूर्यकुमार यादव याचा पर्याय असेल, असे युवराज सिंह म्हणाला. 

विकेटकीपर कोण ?

पाचव्या क्रमांकासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतील. पण डावखुरा फलंदाज हवाय. कारण, मैदानावर एकाचवेळी डावखुरा आणि उजव्या हाताचे फलंदाज असतील, तेव्हा प्रतिस्पर्धी संघाला गोलंदाजी करणं कठीण होईल. पाचव्या क्रमांकावर ऋषभ पंत हा चांगला पर्याय असेल. संजू सॅमसनही चांगली पर्याय आहे, पण पंत डावखुरा असल्यामुळे त्याचं पारडं जड आहे, असे युवराज म्हणाला. युवराजने यष्टिरक्षकाच्या महत्त्वाच्या भूमिकेसाठी संजू सॅमसनपेक्षा ऋषभ पंत याला पंसती दिली. तो म्हणाला की, पंत आणि संजूने आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली आहे. 

ऋषभ पंत यालाच का मिळणार संधी ? 

संजू सॅमसन यानं राजस्तानसाठी फक्त कर्णधार म्हणून काम केले नाही, तर फलंदाजीत त्याने महत्वाचं योगदान दिलेय. या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो सध्या सातव्या स्थानावर आहे, त्याने 14 सामन्यांमध्ये 156.32 च्या प्रभावी स्ट्राइक रेटने 504 धावा केल्या आहे. राजस्थानने आठ विजय मिळवत प्लेऑफमध्येही प्रवेश केलाय.  दुसरीकडे ऋषभ पंत याने शानदार कमबॅक केलेय. तो आयपीएलमध्ये पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करत होता. त्याने मध्यक्रममध्ये फटकेबाजी करत धावा जमवल्या आहेत. पंतने 13 सामन्यात 446 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 155 इतका राहिलाय. दोघांनीही खोऱ्याने धावा चोपल्या आहेत.  

संजू आणि पंत यांच्यातील एकाची निवड करणं कठीण आहे. पण डावखुरा फलंदाज हवा असल्यामुळे पंत याला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळेल, असे युवराज म्हणाला. ऋषभ पंत भारताला कोणत्याही स्थितीमध्ये सामना जिंकून देऊ शकतो, त्याने भूतकाळात हे अनेकदा सिद्ध कलेय, असेही युवराज म्हणाला. 

फिनिशर कोण, अष्टपैलू कोण ?

सहाव्या क्रमांकावर हार्दिक पांड्या याचा पर्याय असेल. तो आयपीएलमध्ये फ्लॉप ठरलाय, पण त्यानं आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली. उपकर्णधार असल्यामुळे त्याचं संघातील स्थानही निश्चित असेल. तो सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येईल, असे युवराज म्हणाला. आयपीएल संपताना पांड्याने गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली आहे. आगामी विश्वचषकात अष्टपैलू खेळाडू चांगली कामगिरी करेल, असा विश्वास युवराजने व्यक्त केला. 

दोन वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या युवारजच्या मते,  शिवम दुबेला आयपीएलमधील प्रभावी कामगिरीनंतर संघात स्थान मिळायला हवं. दरम्यान, दुबेने चेन्नई सुपर किंग्जसाठी 14 सामन्यात 162.29 च्या सरासरीने 396 धावा केल्या. सुरुवातीला फक्त एक फलंदाज म्हणून दाखवत असला तरी, त्याने पंजाब किंग्जविरुद्ध उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी केली, ज्यामुळे भारताला T20 विश्वचषकात गोलंदाजीचा दुसरा पर्याय उपलब्ध झाला.

शिवम दुबे यानं आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली आहे. मध्यक्रम अथवा लोअर ऑर्डरमध्ये दुबे प्रभावी कामगिरी करेल, असं वाटतेय. 

चहलबद्दल काय म्हणाला युवी -

युजवेंद्र चहल याला पुन्हा एकदा संघात पाहून युवराजला आनंद झाला, त्याने ऑगस्ट 2023 नंतर टी20 क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. चहलने आयपीएलमध्ये शानदार गोलंदाजी केली. चहल यानं शानदार गोलंदाजी केली, त्यामुळे त्याला विश्वचषकाच्या ताफ्यात स्थान मिळाले. विश्वचषक उत्तरार्धाकडे झुकल्यानंतर खेळपट्ट्या संथ होतील, त्यावेळी फिरकी गोलंदाजाची भूमिका महत्वाची असेल. 

वेगवान गोलंदाज - 

जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्या अनुभवाला अर्शदीप सिंह याची जोड आहे. आपला संघ मजबूत दिसत आहे. पण टीम इंडियाला सिद्ध करावे लागले, असे युवराज म्हणाला.

नामदेव कुंभार हे मागील नऊ ते दहा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. क्रीडा, राजकारण, समाजकारण, शेती, चित्रपट, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये आवड आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी!केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी!केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी!केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी!केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
Patanjali : समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
Embed widget