IPL 2022 : अर्जुनला मुंबईकडून प्लेईंग 11 मध्ये संधी नाहीच, सचिन तेंडुलकर म्हणतो....
IPL 2022 : मुंबईने यंदा अनेक खेळाडूंना प्लेईंग 11 मध्ये संधी दिली.. पण अर्जुन तेंडुलकरला स्थान दिले नाही. यावरुन चाहत्यांनी मुंबईला प्रश्नही केले..
Sachin Tendulkar Arjun Tendulkar Mumbai Indians IPL 2022 : आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबई इंडियन्सचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. मुंबई इंडियन्सला तब्बल 10 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईने अनेक खेळाडूंना प्लेईंग 11 मध्ये संधी दिली.. पण अर्जुन तेंडुलकरला स्थान दिले नाही. यावरुन चाहत्यांनी मुंबईला प्रश्नही केले.. अखेरच्या काही सामन्याआधी प्रत्येकवेळा अर्जुनच्या पदार्पणाची चर्चा व्हायची. मात्र मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपलं पण अर्जुन बाकावरच राहिला. दोन वर्षांपासून अर्जुन तेंडूकलर बाकावरच आहे. आता अर्जुनला पदार्पणासाठी पुढील वर्षांपर्यंत वाट पाहायला लागणार आहे. अर्जुन तेंडुलकरच्या आयपीएल पदार्पणावर सचिन तेंडुलकरने प्रतिक्रिया दिली आहे.
दोन वर्षांत मुंबईचे 28 सामने झाले. पण एकदाही अर्जुनला संधी मिळाली नाही. अर्जुनला संघात स्थान न मिळल्यावर सचिन तेंडुलकरने प्रतिक्रिया दिली आहे. अर्जुनसाठी हा रस्ता खूप कठीण जाणार असून त्याला खूप मेहनत करावी लागणार आहे, असे सचिन तेंडुलकर म्हणाला आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ अपलोड केलाय. ज्यामध्ये तो चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत होता. यामध्ये अर्जुन तेंडुलकरच्या पदार्पणावर एका चाहत्याने प्रश्न केला होता. त्यावर सचिन तेंडुलकर म्हणाला की, 'हा वेगळा प्रश्न आहे. मला काय वाटतं किंवा मी काय विचार करतो हे अजिबात महत्त्वाचं नाही. असो, पण आता मुंबईसाठी आयपीएलचा हंगाम संपलाय.'
मुंबई इंडियन्सच्या संघनिवडीत अजिबात हस्तक्षेप करत नाही. या सगळ्याची जबाबदारी टीम आणि व्यवस्थापनावर असते. कारण मला माझं काम करायला आवडतं, असे सचिन तेंडुलकरने सांगितलेय.
पाहा व्हिडीओ
अष्टपैलू अर्जुन तेंडुलकरना मुंबईने तीस लाख रुपयांमध्ये खरेदी केले होते. 22 वर्षीय अर्जुन तेंडुलकरने स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघाचं प्रतिनिधित्व केले आहे. अर्जुन मुंबईकडून दोन टी 20 सामन्यात खेळला आहे.
हे देखील वाचा-