12 चेंडूत 41 धावा..., श्वास रोखायला लावणारा सामना, अखेरच्या 2 षटकातील थरार जसाच्या तसा
RR vs SRH, IPL 2023 : ग्लेन फिलिप्स याने सात चेंडूत २५ धावांची खेळी केली. तर अब्दुल समज याने सात चेंडूत १७ धावांचे योगदान दिले.
RR vs SRH, IPL 2023 : थरारक सामन्यात हैदराबादने राजस्थानचा चार विकेटने पराभव केला. राजस्थानने दिलेले २१५ धावांचे आव्हान हैदराबादने अखेरच्या चेंडूवर पूर्ण केले. या विजयासह हैदराबादने स्पर्धेतील आव्हान जिंवत ठेवलेय. अखेरच्या दोन षटकात हैदराबादने बाजी मारली. ग्लेन फिलिप्स याने सात चेंडूत २५ धावांची खेळी केली. तर अब्दुल समज याने सात चेंडूत १७ धावांचे योगदान दिले. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी पाच धावांची गरज असताना संदीप शर्माने नो बॉल फेकला. त्यानंतर अखेरच्या चेंडूवर अब्दुल समद याने षटकार लगावत हैदराबादला विजय मिळवून दिला. अखेरच्या 12 चेंडूत नेमकं काय काय घडले.. अखेरचा थरार.. जसाच्या तसा.. वाचा
फिलिपचे वादळ... सलग तीन षटकार - 19 व्या षटकात काय झाले?
अखेरच्या १२ चेंडूत हैदराबादला विजयासाठी ४१ धावांची गरज होती. संजू सॅमसन याने कुलदीप यादव याच्याकडे चेंडू सोपवला. ग्लेन फिलिप फलंदाजीसाठी मैदानात होता... १९ व्या षटकातील पहिल्या चेंडूवर ग्लेन फिलिप याने षटकार लगावला.. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरही फिलिप याने कुलदीपचा चेंडू सिमापार लावला.. फिलिप याने दोन चेंडूवर दोन षटकार लगावत कुलदीपवर दबाव निर्माण केला.. फिलिप याने तिसऱ्या चेंडूवरही षटकार मारला..अन् चौथ्या चेंडूवर चौकार लगावला.. फिलिप याने कुलदीपच्या चार चेंडूवर २२ धावा चोपल्या.. सामन्यात रंगत निर्माण झाली. पाचव्या चेंडूवर फिलिप याला बाद करत कुलदीप याने सामन्यात रंगत आणली. मार्को जानसन याने कुलदीपच्या अखेरच्या चेंडूवर दोन धावा घेतल्या. कुलदीपच्या या षटकात म्हणजेच १९ व्या षटकात २४ धावा निघाल्या..
संदीप शर्माची एक चूक अन् हैदराबादने जिंकला सामना - 20 व्या षटकातील थरार...
अखेरच्या षटकात १७ धावांची गरज होती.. चेंडू संदीप शर्माच्या हातात होता..फलंदाजीसाठी अब्दल समद आणि मार्को यान्सन मैदानात होते.. संदीप शर्माने वाईड यॉर्कर चेंडू फेकला.. अब्दुल समद याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला.. पण मकॉय याने झेल सोडला.. पहिल्या चेंडूवर अब्दुल समद याने दोन धावा घेतल्या. आता पाच चेंडूत १५ धावांची गरज होती.. संदीप शर्माने यॉर्कर फेकला.. पण अब्दुल समद याने या चेंडूवर षटकार लगावला.. आता चार चेंडूत नऊ धावांची गरज होती.. अब्दुल समद याने तिसऱ्या चेंडूवर दोन धावा घेतल्या...
हैदराबादला विजयासाठी तीन चेंडूत सात धावांची गरज होती.. अब्दुल समद याला मोठा फटका मारता आला नाही. चौथ्या चेंडूवर फक्त एक धाव घेता आला. दोन चेंडूत सहा धावांची गरज होती... मार्को यान्सन यालाही एकच धाव घेता आली. अखेरच्या चेंडूवर हैदाराबादला विजयासाठी पाच धावांची गरज होती. संदीप शर्माने चेंडू फेकला अन् अब्दुल समद याने हवेत जोरात मारला.. जो रुटने झेल घेतला..त्यानंतर राजस्थानच्या सपोर्टर आणि खेळाडूंनी जल्लोष केला.. पण पंचांनी हा चेंडू नो बॉल असल्याचे सांगितले. राजस्थानच्या खेळाडूंचा आनंद क्षणात मावळला... अखेरच्या चेंडूवर समदला चार धावांची गरज होती.. नो बॉल पडल्यामुळे संदीप शर्मा दबावात गेला.. अब्दुल समद याने याचाच फायदा घेत स्ट्रेटला षटकार लगावत हैदराबादला थरारक विजय मिळवून दिला...
Abdul Samad has done it...!!
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 7, 2023
RR won it a few minutes ago, but a No Ball turned the match for SRH. One of the finest matches in history! pic.twitter.com/CHS0ssMOLu
A winning team lost and the losing team won in frames.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 7, 2023
What a finish by SRH! pic.twitter.com/kw9PQqO5Y2
This is unbelievable!!
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 7, 2023
It's a No Ball on the final ball.