RCB Vs KKR: किंग कोहली एकटा नडला; कोलकाता नाइट रायडर्सला विजयासाठी 183 धावांचं आव्हान
Royal Challengers Bengaluru Vs Kolkata Knight Riders: केकेआरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.

Royal Challengers Bengaluru Vs Kolkata Knight Riders: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात आज आयपीएलचा सामना होत आहे. केकेआरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. आरसीबीने फलंदाजी करताना 182 धावा केल्या. कोलकाताला सामना जिंकण्यासाठी 183 धावांचं लक्ष्य दिलं आहे.
आरसीबीकडून फलंदाजी करताना संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस 8 धावा करत बाद झाला आहे. केकेआरचा वेगवान गोलंदाज हर्षित राणेने त्याला झेलबाद केले. त्यानंतर कॅमरॉन ग्रीनने आक्रमक फलंदाजी करत 33 धावा केल्या. मात्र मोठी खेळी करण्यात ग्रीनला अपयश आले. ग्ले मॅक्सवेल आणि विराट कोहलीने संघाला सावरले. नारायणने मॅक्सवेलला 28 धावांवर झेलबाद केले. आज पुन्हा रजत पाटीदार मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरला. विराट कोहलीने संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. कोहलीने 59 चेंडूत 83 धावा केल्या. तर दिनेश कार्तिकने अखेरच्या क्षणी येऊन संघासाठी महत्वाच्या धावा केल्या. कार्तिकने 8 चेंडूत 20 धावा केल्या.
Innings Break‼️
— IndianPremierLeague (@IPL) March 29, 2024
A Virat Kohli masterclass propels #RCB to 182/6 🙌
Will #KKR chase it down? 🤔
Match Updates ▶️ https://t.co/CJLmcs7aNa #TATAIPL | #RCBvKKR pic.twitter.com/J0a7geIo52
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू Playing XI:
विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत (w), दिनेश कार्तिक, अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.
Royal Challengers Bengaluru (Playing XI): Virat Kohli, Faf du Plessis(c), Cameron Green, Rajat Patidar, Glenn Maxwell, Anuj Rawat(w), Dinesh Karthik, Alzarri Joseph, Mayank Dagar, Mohammed Siraj, Yash Dayal
कोलकाता नाइट रायडर्स Playing XI:
फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रमणदीप सिंग, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, मिचेल स्टार्क, अनुकुल रॉय, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
Kolkata Knight Riders (Playing XI): Philip Salt(w), Venkatesh Iyer, Shreyas Iyer(c), Ramandeep Singh, Rinku Singh, Andre Russell, Sunil Narine, Mitchell Starc, Anukul Roy, Harshit Rana, Varun Chakaravarthy
सुनील नारायणच्या नावावर मोठा विक्रम
कोलकाताचा फिरकीपटू गोलंदाज सुनील नारायण मैदानात उतरताच एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. नारायण आज आरसीबीविरुद्ध टी-20 कारकिर्दीतील 500 वा सामना खेळणार आहे. याआधी पोलार्डने 660 सामने खेळले आहेत. ड्वेन ब्राव्होने 573 सामने खेळले आहेत तर शोएब मलिक 542 सामने खेळून या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
संबंधित बातम्या:
'साक्षी भाभीनंतर मी एकच असा व्यक्ती...'; भर कार्यक्रमात एमएस धोनीसमोर जाडेजा हे काय बोलून गेला!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
