(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'साक्षी भाभीनंतर मी एकच असा व्यक्ती...'; भर कार्यक्रमात एमएस धोनीसमोर जाडेजा हे काय बोलून गेला!
IPL 2024 Chennai Super Kings: चेन्नई सुपर किंग्स संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी, रवींद्र जाडेजा आणि रचिन रवींद्र एका कार्यक्रमात सामील झाले होते.
IPL 2024 Chennai Super Kings: चेन्नई सुपर किंग्स संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी, रवींद्र जाडेजा आणि रचिन रवींद्र एका कार्यक्रमात सामील झाले होते. या कार्यक्रमात धोनी आणि जाडेजाने 2023 मधील अंतिम सामन्यातील आठवणींना उजाळा दिला. 2023 मधील आयपीएलच्या अंतिम सामन्यात चेन्नईने गुजरातचा पराभव केला होता. हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेले होता. यामध्ये चेन्नईला विजयासाठी एका चेंडूत 4 धावांची आवश्यकता होती. यामध्ये जाडेजाने चौकार मारत चेन्नईला पाचवं विजेतेपद मिळवून दिले होते.
एमएस धोनीने यावेळी रवींद्र जाडेजाचे कौतुक केले. जाडेजाची ही खेळी खूप अस्मरणीय होती. आपल्याला टीव्हीवर पाहणे खूप सोपे वाटते मात्र हे खूप कठीण काम आहे. त्या परिस्थितीत मला विश्वास होता की जड्डूकडे कौशल्य आणि मानसिकता आहे की तो लक्ष्य पूर्ण करू शकतो. पण तरी हेच होईल, याची खात्री नसते, असं धोनी यावेळी म्हणाला. मला आनंद आहे की आम्ही जिंकलो. त्यावेळी भावना उंचबळून आलेल्या होत्या. त्यामुळे जड्डूने त्याक्षणी जशी फलंदाजी केली, त्याचे खूप कौतुक वाटते, असं धोनीनी सांगितले.
रवींद्र जाडेजा काय म्हणाला?
चेन्नईला शेवटच्या 2 चेंडूवर 10 धावांची गरज होती. यावेळी जडेजाने षटकार आणि मग चौकार मारत चेन्नईला विजेतेपद जिंकून दिले होते. त्यावेळी कर्णधार धोनीने त्याला उचलून आनंद व्यक्त केला होता. या क्षणाचा व्हिडिओ आणि फोटो खूप व्हायरल झाले होते. यावर जाडेजाने या कार्यक्रमात गमतीशीर प्रतिक्रिया दिली. मला वाटतं की, साक्षी भाभीनंतर मी एकच असा व्यक्ती असेल, ज्याला माही भाईने उचलले असेल, असं जडेजा म्हणाला. यानंतर सर्वच जणांना हसू अनावर झाले.
POV: Thala and 𝙩𝙝𝙚 𝙢𝙤𝙢𝙚𝙣𝙩 💛🥹#WhistlePodu 🦁@TVSEurogrip pic.twitter.com/Oell4cWTfO
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 28, 2024
CSK ची IPL 2024 मधील कामगिरी
चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. दोन्ही सामने जिंकून या संघाने गुणतालिकेत पहिल्या क्रमांकाचा मुकुट कायम ठेवला आहे. CSK चा पहिला सामना 22 मार्च रोजी RCB विरुद्ध होता. सीएसकेने हा सामना सहा गडी राखून जिंकला. दुसरा सामना 26 मार्च रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध होता. सीएसकेने हा सामना 63 धावांनी जिंकला.
चेन्नई सुपर किंग्जचा पुढचा सामना
चेन्नई सुपर किंग्जचा पुढचा सामना 31 मार्चला आहे. CSK हा सामना विशाखापट्टणमच्या क्रिकेट इंटरनॅशनल स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्ससोबत खेळणार आहे. यानंतर CSK चा चौथा सामना 5 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे.
Looking back at game 2️⃣ with our Batting coach Huss! 🗣️🎙️
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 28, 2024
Here’s the full video! 📹#WhistlePodu #Yellove 🦁💛