Video : विराट म्हणाला स्वाभिमानासाठी लढलो, फाफनं काय चुकलं ते मांडलं, डीकेच्या भेटीगाठी, ड्रेसिंग रुममध्ये काय घडलं?
RCB vs RR : राजस्थान रॉयल्स विरुद्ध पराभव झाल्यानं आरसीबीचं आव्हान संपुष्टात आलं आहे. आरसीबीनं पराभवानंतर ड्रेसिंग रुममधील व्हिडीओ शेअर केला आहे.
अहमदाबाद : आयपीएलच्या 17 व्या पर्वाचा (IPL 2024) पहिला टप्पा संपत असताना अगदी 3 मे पर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेऑफमध्ये पोहोचेल असं कुणालाही वाटलं नव्हतं. आरसीबी तोपर्यंत गुणतालिकेत दहाव्या स्थानावर होती. पुढच्या 15 दिवसांमध्ये आरसीबीच्या सर्व खेळाडूंनी दमदार कामगिरी करत, सलग सहा मॅचेसमध्ये विजय मिळवत गुणतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेत प्लेऑफमध्ये प्रवेश केला. आरसीबीला एलिमिनेटरमध्ये राजस्थान रॉयल्सकडून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मॅक्सवेल रुममध्ये जाताना दारावर हात मारताना दिसतो. विराट कोहली मोबाइलमध्ये काही तरी करण्यात व्यस्त असताना पाहायला मिळतोय. तर, दिनेश कार्तिकला सिराजनं उचलून घेतलेलं पाहायला मिळतं. फाफ डु प्लेसिस युवा खेळाडूंसोबत चर्चा करुन त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतोय.
आरसीबीनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 8 विकेटवर 172 धावा केल्या होत्या. तर, राजस्थाननं 6 विकेटवर 174 धावा करत क्वालिफायरमध्ये प्रवेश मिळवला. तर, बंगळुरुचं आयपीएलमधील आव्हान संपलं. या पराभवानंतर विराट कोहली, कॅप्टन फाफ डु प्लेसिस आणि दिनेश कार्तिक यांच्यासह संपूर्ण टीमचा एक व्हिडीओ बंगळुरुकडून शेअर करण्यात आला आहे. यामध्ये फाफ डु प्लेसिस, विराट कोहली आणि दिनेश कार्तिकनं यंदाच्या आयपीएलमधील प्रवास आणि राजस्थान विरुद्धच्या मॅचबद्दलच्या भावना मांडल्या आहेत.
पाहा व्हिडीओ
Unfortunately, sport is not a fairytale and our remarkable run in #IPL2024 came to an end. Virat Kohli, Faf du Plessis and Dinesh Karthik express their emotions and thank fans for their unwavering support. ❤️#PlayBold #ನಮ್ಮRCB pic.twitter.com/FYygVD3UiC
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 23, 2024
फाफ डु प्लेसिस काय म्हणाला?
आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात आम्ही सहा मॅचेस मगावल्या होत्या. चाहत्यांच्या अपेक्षा वाढलेल्या होत्या. आम्ही विशेष कामगिरी करायचं ठरवलं आणि सूर गवसल्याचं फाफ डु प्लेसिसनं म्हटलं.
फाफ डु प्लेसिसनं ड्यूचा परिणाम जाणवल्याचं म्हटलं. याशिवाय त्यानं त्याच्या 15 धावा कमी पडल्याचं सांगितलं. आम्ही तळाला होतो पण प्रत्येक स्टेडियमवर चाहते पाठिंबा देत होते.आम्हाला सूर गवसल्यानंतर चांगली कामगिरी करुन दाखवली असं फाफ डु प्लेसिस म्हणाला. ट्रॉफी पर्यंत पोहोचण्यासाठीची दोन पावलं कमी पडली, असं फाफ डु प्लेसिसनं म्हटलं.
विराट कोहली काय म्हणाला?
विराट कोहलीनं आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात आमची कामगिरी समाधानकारक नव्हती, असं म्हटलं. क्रिकेटर म्हणून ज्याप्रमाणं खेळ कला पाहिजे तसा खेळ होता नव्हता. यानंतर आम्ही व्यक्त होऊ लागला, आम्ही स्वाभिमानासाठी खेळू लागलो आणि आमचा आत्मविश्वास परत आला, असं विराट कोहली म्हणाला. पुढे आमच्या मनाप्रमाणं घडत गेलं, आम्ही सहा मॅच जिंकल्या आणि प्लेऑफमध्ये प्रवेश केला. या टीममधील सर्व खेळाडूंचा अभिमान वाटतो. आम्हाला जसं खेळायचं होतो तसं खेळत होतो, असं विराट कोहलीनं म्हटलं.
आरसीबीच्या चाहत्यांचे आभार मानतो. फक्त बंगळुरुचं नाही तर देशभरात जिथं खेळलो तिथं चाहत्यांनी पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो, असं विराट कोहली म्हणाला.
दिनेश कार्तिकनं काय म्हणाला?
सहा पैकी सहा मॅच जिंकणं हे आनंददायी होतं. खेळामध्ये परिकथेचा शेवट होत नसतो. खेळात एखादा दिवस तुमच्या प्रमाणं नसतो तसाच दिवस आजचा होता, असं दिनेश कार्तिक म्हणाला. रात्रीच्या मॅचमध्ये ड्यूचा परिणाम जाणवतो, बॉल बॅटवर येतो पण आमच्या गोलंदाजांनी जी कामगिरी केली त्याचा अभिमान वाटतो, असं कार्तिक म्हणाला. आरसीबीसाठी हा विशेष हंगाम होता, असं कार्तिकनं म्हटलं.
संबंधित बातम्या :
RCB कडून गार्ड ऑफ ऑनर, विराटची मिठी; डीके दादाच्या निवृत्तीनंतर अख्खं मैदान भावूक, पाहा व्हिडीओ!