RCB कडून गार्ड ऑफ ऑनर, विराटची मिठी; डीके दादाच्या निवृत्तीनंतर अख्खं मैदान भावूक, पाहा व्हिडीओ!
Dinesh Karthik : रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरुचा विकेटकीपर दिनेश कार्तिकनं आयपीएलमधून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. आरसीबीनं त्याला गार्ड ऑफ ऑनर दिला.

अहमदाबाद : रॉयल चलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Banglaluru) ही आयपीएलमधील एकमेव टीम आहे जी सर्वाधिक वेळा प्लेऑफमध्ये पोहोचली मात्र त्यांना विजेतेपद मिळवता आलं नाही. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी सेडियमवर देखील त्याचीच पुनरावृत्ती झाली. राजस्थाननं (Rajasthan Royals) बंगळुरुला पराभूत केलं.आरसीबीच्या या पराभवासोबतच टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू दिनेश कार्तिकचा (Dinesh Karthik) आयपीएलमधील प्रवास संपला. दिनेश कार्तिकला आरसीबीच्या खेळाडूंकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यावेळी मैदानावरील वातावरण भावूक बनलं होतं.
आरसीबीचा जय पराजयाचा प्रवास संपला
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं पहिल्या आठ सामन्यांमधील 1 विजय आणि 7 पराभवानंतर पुढील सहा मॅचेसमध्य सलग 6 मॅचमध्ये विजय मिळवत प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. राजस्थान रॉयल्सनं पराभव केल्यानं बंगळुरुचा स्वप्नवत प्रवास अखेर संपला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या पराभवासह आरसीबी स्पर्धेबाहेर गेली.
विराट कोहलीची दिनेश कार्तिकला मिठी
राजस्थान रॉयल्सनं मॅच जिंकल्यानंतर विराट कोहलीनं सर्व खेळाडूंसोबत हस्तोंदलन केलं. विराट कोहलीनं इतर खेळाडूंसोबत हस्तोंदलन केलं. दिनेश कार्तिक समोर येताच विराट कोहलीनं त्याला मिठी मारली. अहमदाबादच्या प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून दिनेश कार्तिकचा सन्मान केला. दिनेश कार्तिकनं हातातून ग्लोव्हज काढत आयपीएलमधून निवृत्तीचे संकेत दिले.
Virat Kohli giving a Farewell hug to Dinesh Karthik from IPL. ❤️ pic.twitter.com/TZXQvl3EOQ
— Johns. (@CricCrazyJohns) May 22, 2024
DK signing off 💔💔 pic.twitter.com/Nwzp06wrRM
— Archer (@poserarcher) May 22, 2024
आयपीएलच्या 2024 च्या पर्वात निवृत्तीचे संकेत
दिनेश कार्तिकनं आयपीएल 2024 च्या पर्वात निवृत्तीचे संकेत दिले होते. आरसीबीसोबत दिनेश कार्तिकचं हे अखेरचं आयपीएल असे संकेत यापूर्वी दिले होते.
A comeback to winning ways when it mattered the most & how 👌👌
— IndianPremierLeague (@IPL) May 22, 2024
Upwards & Onwards for Rajasthan Royals in #TATAIPL 2024 😄⏫
Scorecard ▶️ https://t.co/b5YGTn7pOL #RRvRCB | #Eliminator | #TheFinalCall pic.twitter.com/NsxjVGmjZ9
आरसीबीचा दिनेश कार्तिकला गार्ड ऑफ ऑनर
राजस्थान विरुद्धची मॅच संपल्यानंतर आरसीबीच्या खेळाडूंनी दिनेश कार्तिकला गार्ड ऑफ ऑनर दिला. दिनेश कार्तिक मैदानावरुन ड्रेसिंग रुमच्या दिशेनं चालत गेला. त्यानंतर आरसीबीचे खेळाडू त्याच्या मागं चालत गेले. दिनेश कार्तिकनं आरसीबीसाठी दिलेल्या योगदानाचा या द्वारे सन्मान करण्यात आला. तो आरसीबीचा महत्त्वाचा फलंदाज होता. डेथ ओव्हरमध्ये दिनेश कार्तिकची कामगिरी महत्त्वाची असायची. प्लेऑफमध्ये दिनेश कार्तिकची भूमिका महत्त्वाची होती.
Dinesh Karthik getting guard of honour from RCB and the crowd chanting 'DK, DK'.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 22, 2024
- The most emotional video. 🥹💔 pic.twitter.com/XZ3WmbO5Ne
दिनेश कार्तिकचं आयपीएल करिअर
दिनेश कार्तिकला आरसीबीकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आल्यानं त्याच्या निवृत्तीची चर्चा आहे. दिनेश कार्तिकनं 257 मॅचेसमध्ये 4842 धावा केल्या असून त्यामध्ये 22 अर्धशतकांचा समावेश आहे.
दिनेश कार्तिकला प्रेक्षकांची पसंती
दिनेश कार्तिकनं आयपीएलमध्ये 17 वर्ष योगदान दिलं. दिनेश कार्तिक या काळात सहा फ्रँचायजीकडून खेळला. दिल्ली डेअरडेविल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स, गुजरात लायन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु.
दिनेश कार्तिकनं दमदार कामगिरीच्या जोरावर 15 बॉलमध्ये 326 धावा केल्या. दिनेशनं 36.22 च्या सरासरीनं आणि 187.36 च्या स्ट्राइक रेटनं धावा केल्या आहेत.
आरसीबीच्या खेळाडूंनी दिनेश कार्तिकला गार्ड ऑफ ऑनर देत भावनिक निरोप दिला. दिनेश कार्तिककडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. जगभरातील क्रिकेट चाहते या अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत.
संबंधित बातम्या :
17 वर्षांचा झंझावात शांत, 39 वर्षीय दिनेश कार्तिकची आयपीएलमधून निवृत्ती, नवी इनिंग सुरु करणार
Virat Kohli : आरसीबीचा विजयरथ राजस्थाननं रोखला, विराट कोहली निराश, पराभवानंतर काय केलं? पाहा व्हिडीओ
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
