VIDEO : आरसीबीविरोधात आज लढत, रोहित शर्मा-आकाश अंबानी एकाच गाडीतून अचानक वानखेडे स्टेडियमवर
IPL 2024, MI vs RCB : बुधवारी सराव सत्र झाल्यानंतर रोहित शर्मा आणि आकाश अंबानी एकाच लग्जरी गाडीमधून प्रवास कराताना स्पॉट झाले.
Rohit Sharma-Akash Ambani : आज मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यामध्ये (IPL 2024, MI vs RCB) वानखेडे स्टेडियमवर आमनासामना होणार आहे. घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सपुढे आरसीबीचं आव्हान असेल. गुणतालिकेत तळाशी असणाऱ्या दोन संघामध्ये आज लढत होणार आहे. त्याआधी बुधवारी सराव सत्र झाल्यानंतर रोहित शर्मा आणि आकाश अंबानी एकाच लग्जरी गाडीमधून प्रवास कराताना स्पॉट झाले. ही गाडी स्वत: आकाश अंबानी चालवत होते. रोहित शर्मा आणि आकाश अंबानी अचानक रात्री वानखेडे स्टेडियमवर पोहचले होते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होतोय. मुंबईचा राज रोहित शर्मा म्हणत एका युजर्सने व्हिडीओ पोस्ट केला आहे. आज आरसीबी आणि मुंबईमध्ये महत्वाचा सामना पार पडणार आहे. मुंबई आणि आरसीबीची सुरुवात अतिशय खराब झाली. त्यातच रोहित शर्मा नाराज असल्याच्या चर्चा धडकल्या होत्या. अंबानी कुटुंबियांकडून रोहित शर्माची समजूत काढण्याचा प्रयत्न कऱण्यात येतोय का ? असा सवाल चाहत्यांकडून उपस्थित कऱण्यात येत आहे.
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात यंदाच्या हंगामात मुंबईची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. सलग तीन पराभवानंतर मुंबईने पहिल्या विजयाची चव चाखली होती. मुंबईने घरच्या मैदानावर दिल्लीचा पराभव करत पहिल्या विजयाची नोंद केली होती. आज मुंबई इंडियन्स दुसऱ्या विजयासाठी मैदानात उतरेल. पण त्यांचा सामना आरसीबीसोबत होणार आहे. आरसीबीचा संघाचीही अवस्था बिकट आहे, आरसीबी गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. आरसीबीली पाच सामन्यात फक्त एक विजय मिळवता आला आहे. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी आरसीबीला विजय गरजेचा आहे. त्यामुळे आजचा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. आरसीबी आणि मुंबईच्या संघाने दोन दिवस कसून सराव केला आहे.
Rohit Sharma with Akash Ambani 🤨🧐 pic.twitter.com/hYSj32vBHo
— Johns (@RITIKAro45) April 10, 2024
आयपीएल 2024 मध्ये मुंबईच्या ताफ्यात मोठे बदल -
आयपीएल 2024 आधी मुंबई इंडियन्सने आपल्या ताफ्यात मोठे बदल केले. मुंबईने हार्दिक पांड्याला गुजरातकडून ट्रेड केलेच, त्याशिवाय त्याच्याकडे कर्णधारपदाची धुराही दिली. मुंबईने रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढले. रोहितला कर्णधारपदावरुन काढल्यानंतर मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पांड्या यांना चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. हार्दिक पांड्याला मैदानातच हूटिंगचा सामना करावा लागला. त्यातच मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सर्वकाही ठीक नसल्याचं समोर आले. मुंबई इंडियन्समध्ये दोन गट पडल्याच्या बातम्या धडकल्या. त्याशिवाय आयपीएल 2025 मध्ये रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून बाहेर पडणार असल्याच्याही चर्चा सुरु झाल्या. मुंबईच्या प्रत्येक सामन्यात हार्दिक पांड्याला चाहत्यांकडून ट्रोल करण्यात आले. मुंबई इंडियन्समध्ये सर्वकाही ठीक नसल्याच्या बातम्या समोर येत असतानाच रोहित शर्मा आणि आकाश अंबानी एकाच गाडीतून प्रवास करताना दिसले. दोघेही अचानक वानखेडे स्टेडियमवर दाखल झाले, त्यामुळे मुंबई इंडियन्समध्ये काहीतरी खलबत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
BREAKING NEWS 🚨🚨🚨
— Shubham 𝕏 (@DankShubhum) April 10, 2024
Anant Ambani has been Appointed as latest driver of captain Rohit Sharma's car 🔥🔥🔥
Rohit Sharma single Handedly Owning Ambani's son .
pic.twitter.com/IcFXf8bYje