एक्स्प्लोर

Rohit Sharma : रोहित शर्माचं महेंद्रसिंह धोनीच्या पावलावर पाऊल, पंजाब विरुद्धच्या मॅचमध्ये इतिहास रचणार

Mumbai Indians vs Punjab Kings : मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज हे आमने सामने येणार आहेत. गुणतालिकेत दोन्ही संघ सध्या तळाला आहेत.

चंदीगड : आयपीएलमध्ये (IPL 2024) आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात 33 वी मॅच होणार आहे. गुणतालिकेत सध्या आठव्या आणि नवव्या क्रमांकावर असलेले पंजाब आणि मुंबई आमने सामने येईल.  पंजाब किंग्जनं सहापैकी चार सामन्यात पराभव स्वीकारलेला असून त्यांना केवळ दोन मॅचमध्ये देखील विजय मिळवता आलेला आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सची देखील तशीच स्थिती आहे. मुंबईनं दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभूत केलं आहे. त्यांना देखील चार पराभवांचा सामना करावा लागला आहे. मुंबई इंडियन्सचा दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आज आणि एक ऐतिहासिक टप्पा गाठणार आहे. 

रोहित शर्माचं पुढचं पाऊल

आज पंजाब किंग्ज विरुद्धच्या मॅचमध्ये रोहित शर्मा त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील 250 वी मॅच खेळेल.  यापूर्वी ही कामगिरी चेन्नई सुपर किंग्जचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी याच्या नावावर आहे.आता रोहित शर्मा हा दुसरा खेळाडू ठरणार आहे.रोहित शर्मानं आयपीएलमध्ये यापूर्वी 249 मॅच खेळलेल्या आहेत. यामध्ये त्यानं 6472 धावा केलेल्या आहेत. रोहित शर्मानं 30.10 च्या सरासरीनं 131.22 च्या स्ट्राइक रेटनं या धावा काढलेल्या आहेत. रोहितनं आयपीएलमध्ये 42 अर्धशतकं झळकवली असून दोन शतकं देखील केली आहेत. रोहित शर्माची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या 109 इतकी आहे. रोहित शर्मानं मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या मॅचमध्ये शतक झळकावलं होतं. मात्र, मुंबईला विजय मिळवता आला नव्हता.

मुंबई आणि पंजाब आमने सामने

यंदाच्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स आमने सामने येतील. दोन्ही संघ गुणतालिकेत अनुक्रमे दोन्ही संघ आठव्या आणि नवव्या क्रमांकावर आहेत. दिल्ली कॅपिटल्सनं गुजरात टायटन्सला मोठ्या फरकरानं पराभूत केल्यानं त्यांनी गुणतालिकेत सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. आजच्या मॅचमध्ये विजय मिळवून प्ले ऑफच्या शर्यतीतील स्थान कायम ठेवण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. 

मुंबई इंडियन्स सलग चार मॅच होम ग्राऊंडवर खेळल्यानंतर पंजाब किंग्जच्या होम ग्राऊंडवर खेळणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील चार मॅचेसमध्ये मुंबई इंडियन्सला दोन मॅचमध्ये विजय मिळाला तर दोनमध्ये पराभव स्वीकारावा लागला. 

रोहित शर्माच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्सनं पाचवेळा विजेतेपद पटकावलं आहे.  मुंबई इंडियन्सच्या टीम मॅनेजमेंटनं रोहित शर्माच्या ऐवजी हार्दिक पांड्याकडे नेतृत्व देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मुंबई इंडियन्सचं नेतृत्त्व हार्दिक पांड्या करत असून यावेळी मुंबईनं सहापैकी चार वेळा पराभव स्वीकारावा लागला. तर, मुंबई इंडियन्सनं दोन मॅचमध्ये विजय मिळवला.

संबंधित बातम्या :  

गुजरातला होम ग्राऊंडवर लोळवलं, रिषभ पंतच्या दिल्लीनं एका दगडात दोन पक्षी मारले, मुंबईला धक्का, हार्दिकचं टेन्शन वाढलं

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
Embed widget