गुजरातला होम ग्राऊंडवर लोळवलं, रिषभ पंतच्या दिल्लीनं एका दगडात दोन पक्षी मारले, मुंबईला धक्का, हार्दिकचं टेन्शन वाढलं
IPL Point Table : गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील मॅचनंतर गुणतालिकेत मोठे फेरबदल झाले आहेत.दिल्लीनं कालची मॅच सहा विकेटनं जिंकली.
![गुजरातला होम ग्राऊंडवर लोळवलं, रिषभ पंतच्या दिल्लीनं एका दगडात दोन पक्षी मारले, मुंबईला धक्का, हार्दिकचं टेन्शन वाढलं ipl 2024 delhi capitals beat gujarat titans and jump to sixth position in points table setaback to mumbai indians गुजरातला होम ग्राऊंडवर लोळवलं, रिषभ पंतच्या दिल्लीनं एका दगडात दोन पक्षी मारले, मुंबईला धक्का, हार्दिकचं टेन्शन वाढलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/18/24c7db63844ee1217bae7e432591d34a1713403261899989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IPL Point Table GT vs DC अहमदाबाद : येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या आयपीएलमधील 32 व्या मॅचचा निकाल धक्कादायक लागला. दिल्ली कॅपिटल्सनं (Delhi Capitals) दमदार कामगिरी करत गुजरात टायटन्सला (Gujarat Titans) पराभवाची धूळ चारली. दिल्ली कॅपिटल्सचा आयपीएलमधील सर्वात मोठा विजय ठरला. रिषभ पंतच्या नेतृत्त्वातील दिल्ली कॅपिटल्सनं आता सलग दुसऱ्या मॅचमध्ये विजय मिळवला आहे. दिल्लीच्या बॉलर्सनी पहिल्यांदा गोलंदाजी करताना गुजरातला केवळ 89 धावांवर रोखलं. यानंतर दिल्लीच्या फलंदाजांनी 9 ओव्हरमध्येच विजयावर नाव कोरलं. दिल्लीच्या या विजयामुळं गुणतालिकेत मोठे उलटफेर झाले आहेत.
दिल्लीकडून जॅक फ्रेजर मॅक्गर्क यानं दिल्लीला आक्रमक सुरुवात करुन दिली. दोन चौकार आणि दोन षटकारांसह त्यानं 20 धावा केल्या. गुजरातच्या स्पेन्सर जॉन्सननं त्याला बाद केला. यानंतर संदीप वॉरिअरनं दिल्लीचा दुसरा सलामीवीर पृथ्वी शॉला देखील बाद केलं.
यानंतर अभिषेक पोरेल आणि शाई होप यांनी 34 धावांची भागिदारी करत दिल्लीचा डाव सावरला. हे दोघेही बाद झाल्यानंतर कप्तान रिषभ पंत आणि सुमित कुमार या दोघांनी नाबाद 25 धावांची भागिदारी करुन दिल्लीच्या विजयावर नाव कोरलं.
रिषभ पंतनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला दिल्लीच्या बॉलर्सनी साथ दिली. दिल्लीच्या बॉलर्सनी गुजरातला 89 धावांवर बाद केलं. गुजरातची ही आयपीएलमधील सर्वात कमी धावसंख्या होती.
इशांत शर्मानं दिल्लीला पहिलं यश शुभमन गिलला 8 धावांवर मिळवून दिलं. रिद्धिमान साहा 2 धावा करुन बाद झाला. यानंतर साई सुदर्शन 12 , डेव्हिड मिलर 2 धावांवर बाद झाला. यानंतर अभिनव मनोहर, राहुल तेवातिया देखील मोठी धावसंख्या करु शकले नाहीत. राशिद खाननं 31 धावांची खेळी केल्यानं गुजरातचा संघ 89 धावांपर्यंत पोहोचला. मुकेश कुमारनं तीन, इशांत शर्मा, ट्रिस्टन स्टब्स यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
दिल्लीच्या विजयानं गुणतालिकेत उलटफेर
दिल्ली कॅपिटल्सनं गुजरात टायटन्सला पराभूत करत खळबळ उडवून दिली. दिल्लीच्या संघानं गुणतालिकेतदेखील मोठी झेप घेतली आहे. आता दिल्ली गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहोचली असून गुजरात टायटन्सची देखील घसरण झाली आहे. गुजरात सातव्या स्थानावर, पंजाब आठव्या तर मुंबई नवव्या स्थानावर आहे. दिल्लीनं एका विजयानं तीन संघांना गुणतालिकेत मागं टाकलं आहे.
दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सच्या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल रिषभ पंतला प्लेअर ऑफ द मॅचनं गौरवण्यात आलं. त्याला हा अवॉर्ड विकेटकीपिंगसाठी देण्यात आला.
संबंधित बातम्या :
आपल्याच जाळ्यात गुजरात अडकला, दिल्लीचा 6 विकेटनं मोठा विजय
टी 20 विश्वचषकात टीम इंडियाचा विकेटकीपर कोण? 6 जणांमध्ये स्पर्धा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)