Rohit Sharma: 'हत्ती धुळीने माखलेला असला तरी...'; नवज्योतसिंह सिद्धू यांनी रोहित शर्माचा व्हिडिओ केला पोस्ट
Rohit Sharma Mumbai Indians: आयपीएल 2024 च्या मिनी लिलावापूर्वीच हार्दिकला मुंबईचा कर्णधार बनवण्यात आले होते.
Rohit Sharma Mumbai Indians: आयपीएल 2024 च्या हंगामात आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) सामना होणार आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर हा रंगतदार सामना होईल. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता मुंबई आणि राजस्थानचा सामना सुरु होईल.
आयपीएल 2024 च्या हंगामात मुंबई इंडियन्सची सुरुवात नेहमीप्रमाणे खूपच खराब झाली आहे. नवा कर्णधार हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली मुंबईने पहिले दोन्ही सामने गमावले. आयपीएल 2024 च्या मिनी लिलावापूर्वीच हार्दिकला मुंबईचा कर्णधार बनवण्यात आले होते, त्यानंतर रोहित शर्माच्या (Rohit Sharma) चाहत्यांमध्ये आणि मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये प्रचंड संताप दिसून आला.
इतकंच नाही तर जेव्हा हार्दिक पांड्या आयपीएल 2024 चा पहिला सामना खेळायला आला तेव्हा मैदानात उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांनीही त्याच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी दिल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले. याचदरम्यान आता आयपीएलमध्ये समालोचकाची भूमिका बजावणारे नवज्योतसिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी सोशल मीडियावर रोहित शर्मासाठी एक पोस्ट शेअर केली आहे.
नवज्योतसिंह सिद्धू यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर रोहित शर्माचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहून रोहित शर्माचे चाहते खूप आनंदी होतील. यासोबत नवज्योतसिंह सिद्धू यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, हत्ती धुळीने माखलेला असला तरी त्याचा सन्मानच केला जातो. नवज्योतसिंह सिद्धू यांच्या या पोस्टवर यूजर्स भरपूर कमेंट करत आहेत.
हाथी चाहे धूल में सना हो फिर भी सम्मानित होगा |
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) March 30, 2024
कूकर को सोने की ज़ंज़ीरो में भी बांध दो सम्मानित नहीं होता | @ImRo45 #IPL2024 pic.twitter.com/ugq5rOor58
रोहित शर्मा जबरदस्त फॉर्मात-
आयपीएल 2024 च्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये रोहित शर्मा जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने 29 चेंडूंचा सामना करत 43 धावांची शानदार खेळी केली. यादरम्यान त्याने 7 चौकार आणि 1 षटकारही लगावला. तर हैदराबादविरुद्ध रोहित 12 चेंडूत 26 धावा केल्या होत्या. यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकारचा समावेश होता.
संबंधित बातम्या:
आंद्रे रसेलची पत्नी आहे सुपरमॉडेल; सोशल मीडियावर नेहमी असते चर्चेत, पाहा Photos