एक्स्प्लोर

MS Dhoni: माही मार रहा है...चाहत्यांसोबत तिनेही मैदान गाजवलं; दिल्लीविरुद्ध चेन्नईनं सामना गमावला तरी मन जिंकलं!

MS Dhoni: ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्लीने हा सामना जिंकला जरी असला तरी या सामन्यात धोनीची क्रेझ पाहायला मिळाली.

Delhi Capitals vs Chennai Super Kings: चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात 31 मार्च रोजी सामना झाला. दिल्लीने प्रथम खेळताना 191 धावा केल्या होत्या, पण चेन्नईला 20 षटकांत केवळ 171 धावा करता आल्या आणि 20 धावांनी सामना गमवावा लागला. 

चेन्नईचा पराभव जरी झाला, मात्र चाहते एमएस धोनीची (MS Dhoni) खेळी पाहून खूप आनंदी आहेत. धोनीने फलंदाजीसाठी येताच पहिल्या चेंडूवर चौकार मारून संघाच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. धोनीने 16 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 37 धावांची नाबाद खेळी केली. मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. 

ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्लीने हा सामना जिंकला जरी असला तरी या सामन्यात धोनीची क्रेझ पाहायला मिळाली. चेन्नईचा सामना पाहण्यासाठी आयशा खान (Ayesha Khan cheering for MS Dhoni) देखील उपस्थित होती. चेन्नईच्या शिवम दुबेची विकेटनंतर धोनी मैदानावर येताच जोरदार जल्लोष झाला. या जल्लोषात आयशा खान देखील सहभागी झाली होती. धोनी मैदानावर येताच आयशा देखील धोनी-धोनी अशी ओरडताना दिसली. आयशा खानच्या या जल्लोषाची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.

कोण आहे आयशा खान?

आयशा खान अभिनेत्री, मॉडेल आणि इन्फ्युएन्सर आहे. आयशा खानने बिग बॉस सीझन 17 मधून आपली ओळख निर्माण केली. टेलिव्हिजन शो 'कसौटी जिंदगी के' मध्ये ज्युनियर कलाकार म्हणून आयशाने पदार्पण केले. तसेच बालवीर रिटर्न्स या शोद्वारे टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले आणि तेलुगूमध्ये मुखचित्रम या कायदेशीर नाटकाद्वारे चित्रपटात पदार्पण केले होते. 

चेन्नईचा पराभव-

आयपीएल 2024 च्या 13व्या क्रमांकाच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत 191/5 धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरने संघाकडून सर्वात मोठी 52 धावांची खेळी खेळली. याशिवाय कर्णधार ऋषभ पंतने 51 धावा केल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जला 20 षटकांत 6 बाद 171 धावांपर्यंतच मजल मारता आली. रहाणेने संघासाठी 45 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. याशिवाय आठव्या क्रमांकावर उतरलेल्या धोनीने चाहत्यांची मने जिंकली.

संबंधित बातम्या:

IPL 2024 Latest Points Table: दिल्लीविरुद्धच्या पराभवामुळे चेन्नईचं मोठं नुकसान; अव्वल स्थान गमावलं, कोणी पटकावलं?, पाहा Latest Points Table

...तेव्हा मिचेल स्टार्क आयपीएलमधील धोकादायक गोलंदाज ठरेल; इरफान पठाणने सांगितलं समीकरण!

आंद्रे रसेलची पत्नी आहे सुपरमॉडेल; सोशल मीडियावर नेहमी असते चर्चेत, पाहा Photos

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget