Mumbai Indians OTD : सलग चार पराभवानंतर मुंबईचा पलटवार,चेन्नईला फायनलमध्ये दणका अन् रोहितनं दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी उंचावली
Mumbai Indians : रोहित शर्माच्या नेतृत्त्वात मुंबईनं पाचवेळा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. त्यातलं दुसरं विजेतेपद आजच्या दिवशी चेन्नईला पराभूत करुन मिळवलं होतं.
मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2024) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी निराशाजनक ठरली. मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये गुणतालिकेत दहाव्या स्थानावर राहिली. मात्र, मुंबई इंडियन्ससाठी 24 मे 2015 हा दिवस अविस्मरणीय ठरला होता. रोहित शर्माच्या (Rohit Sharma ) नेतृत्त्वातील मुंबई इंडियन्सनं अविश्वसनीय कामगिरी करुन दाखवली होती. आयपीएलच्या सुरुवातीला सलग चार मॅचमध्ये पराभव स्वीकारणाऱ्या मुंबईनं पुढच्या अकरा मॅचमध्ये 9 मॅचमध्ये विजय मिळवला अन् बलाढ्य चेन्नई सुपर किंग्जवर अंतिम फेरीच्या लढतीत विजय मिळवला होता. या विजयासह मुंबईच्या खेळाडूंसह रोहित शर्मानं आयपीएलची ट्रॉफी उंचावली होती.
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जनं आयपीएलमध्ये पाच पाच वेळा विजेतेपद पटकावलं आहे. मुंबई इंडियन्सला पहिल्यांदा विजेतेपद रोहित शर्माकडे नेतृत्त्व आल्यानंतर मिळालं होतं. रोहित शर्माच्या टीमनं मुंबईला पहिल्यांदा 2013 मध्ये विजेतेपद मिळवून दिलं. यानंतर पुढच्या वर्षीच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला एलिमिनेटरच्या लढतीत चेन्नई विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता.
2015 च्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज गुणतालिकेत पहिल्या स्थानावर होती. तर, दमदार कामगिरीद्वारे कमबॅक करणारी मुंबई इंडियन्स दुसऱ्या स्थानावर होती. मुंबई आणि चेन्नई यांच्यात प्लेऑफमध्ये क्वालिफायर-1ची लढत झाली. या लढतीत मुंबईनं चेन्नईला 25 धावांनी पराभूत केलं. यानंतर चेन्नईनं आरसीबीला क्वालिफायर 2 मध्ये पराभूत करत पुन्हा अंतिम फेरीच्या लढतीत प्रवेश केला.
चेन्नईनं टॉस जिंकून पहिल्यांदा मुंबईला फलंदाजीला आमंत्रित केलं. मुंबईनं या संधीचा फायदा घेत कोलकाता येथील इडन गार्डन्सवर धावांचा डोंगर उभा केला. रोहित शर्मा आणि सिमोन्सच्या दमदार खेळीच्या जोरावर मुंबईनं चांगली सुरुवात केली होती. पार्थिव पटेल पहिल्याच ओव्हरमध्ये शुन्यावर बाद झाला होता. रोहित आणि सिमोन्सनं दुसऱ्या विकेटसाठी 119 धावांची भागिदारी केली होती. यामध्ये रोहित शर्मानं 26 बॉलमध्ये 50 तर सिमोन्सनं 45 बॉलमध्ये 68 धावा केल्या होत्या. कायरन पोलर्ड आणि अंबाती रायडू यांनी यानंतर मुंबईचा डाव सावरला आणि टीमला 20 ओव्हरमध्ये 202 धावांपर्यंत पोहोचवलं.
अन् मुंबईनं इतिहास रचला
चेन्नई सुपर किंग्जनं त्यांच्या डावाची सुरुवात धिम्या गतीनं केली होती. मायकल हस्सी पाचव्या ओव्हरमध्ये बाद झाला. यानंतर ड्विन स्मिथ आणि सुरेश रैना यांनी 60 धावांची भागिदारी करत चेन्नईला मॅचमध्ये परत आणलं होतं. मात्र, दोघेही नंतर लगेचच बाद झाले. यानंतर मिशेल मॅकग्लेघन आणि हरभजन सिंगया दोघांनी दोन दोन विकेट घेतल्या. तर, लासिथ मलिंगानं तीन विकेट घेतल्या गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर चेन्नईचा संघ 20 ओव्हरमध्ये 8 विकेटवर 161 धावा करु शकला आ.
मुंब इंडियन्सनं चेन्नईवर 41 धावांनी विजय मिळवत 2014 मधील एलिमिनेटरच्या लढतीतील पराभवाचा बदला घेतला होता. रोहित शर्मा आणि त्याच्या टीमनं अविश्वसनीय कामगिरी करत मुंबईला दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवून देत इतिहास रचला होता.
संबंधित बातम्या :