(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रोहित हमारा कैप्टन है… हिटमॅनला पाहताच चाहत्यांचा नारा, हार्दिकचा महागड्या गाडीने प्रवास
Hardik Pandya vs Rohit Sharma : हार्दिक पांड्याला मुंबईचं कर्णधार केल्यानंतर चाहत्यांचा संताप झाला. रोहित शर्माच्या चाहत्यांकडून हार्दिक पांड्याला ट्रोल कऱण्यात येतेय.
Hardik Pandya vs Rohit Sharma : हार्दिक पांड्याला मुंबईचं कर्णधार केल्यानंतर चाहत्यांचा संताप झाला. रोहित शर्माच्या चाहत्यांकडून हार्दिक पांड्याला ट्रोल कऱण्यात येतेय. सामन्यादरम्यान आणि सोशल मीडियावरही हार्दिकविरोधात नारा दिला जातोय. रोहित शर्मा याच्याबद्दलचे चाहत्यांचे प्रेम अधिकच वाढलेले दिसतेय. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मागील सामन्यात मुंबईने हैदराबादचा पराभव केला. त्या सामन्यात हार्दिकने भेदक मारा केला होता. त्यावेळी चाहत्यांनी हार्दिक पांड्याला आपला कर्णधार म्हणून मान्य केलेय, असे म्हटले जात होते. पण व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतून चाहत्यांची नाराजी मात्र कायम असल्याचे दिसत आहे. चाहते आणखी हार्दिक पांड्याला मुंबईचा कर्णधार मान्य करायला तयार नाहीत. रोहित शर्माच आपला कर्णधार असल्याची भावना चाहत्यांची आहे. मुंबई इंडियन्सचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. त्यामध्य रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या पुढील सामन्यासाठी संघासोबत जात आहेत. त्यावेळी चाहत्यांकडून रोहित शर्माच्या नावाचा जयघोष केल्याचं दिसत आहे.
रोहित हमारा कैप्टन है… !
मुंबई इंडियन्सचा पुढील सामना कोलकाता नाईट रायडर्सविरोधात ईडन गार्डन मैदानावर होणार आहे. या सामन्यासाठी मुंबईचा संघ कोलकात्यामध्ये दाखल झालाय. पण त्याआधी एअरपोर्टवर रोहित शर्माच्या नावाचा जयघोष झाला. लसीथ मलिंगा याच्यासह सपोर्ट स्टाफ आणि मुंबईचा संपूर्ण संघ दिसत आहे. रोहित शर्माची एन्ट्री होताच चाहत्यांकडून एकच जयघोष करण्यात आला. चाहत्यांनी रोहित शर्माला पाहातच घोषणाबाजी सुरु केली. रोहित हमारा कैप्टन है… आशा घोषणा चाहत्यांनी रोहित शर्माला पाहाताच दिल्या.
View this post on Instagram
चाहत्यांच्या या घोषणाबाजीवर रोहित शर्माकडून कोणताही रिअॅक्शन दिसली नाही. रोहित शर्मा शांततेच चेक इन करुन निघून केला. त्यावेळी संघासोबत हार्दिक पांड्याही उपस्थित होता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांना हार्दिक पांड्या कर्णधार म्हणून मान्य नसल्याचे दिसतेय. हार्दिक पांड्याऐवजी पाच वेळा मुंबईला चषक जिंकून देणाऱ्या रोहित शर्मावर चाहत्यांचा जास्त विश्वास असल्याचे दिसतेय.
हार्दिकचा महागड्या गाडीने प्रवास
मुंबई विमानतळावर येण्यासाठी हार्दिक पांड्या महागड्या गाडीतून आल्याचं दिसले. हार्दिक पांड्या रिलॅक्स दिसत होता. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
View this post on Instagram