Shatrughan Sinha Health Updates : शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल का झाले? समोर आले कारण, सोनाक्षीच्या लग्नानंतर...
Shatrughan Sinha Health Updates : शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा अभिनेता लव सिन्हा याने त्यांच्या प्रकृतीबाबत अपडेट दिली आहे.
Shatrughan Sinha Health Updates : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने (Sonakshi Sinha) प्रियकर झहीर इक्बालसोबत लग्नगाठ बांधल्यानंतर काही दिवसातच सोनाक्षीचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha Health Updates ) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर उलटसुलट चर्चा सुरू होत्या. शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा अभिनेता लव सिन्हा (Luv Sinha) याने त्यांच्या प्रकृतीबाबत अपडेट दिली आहे.
लवने दिली शत्रुघ्न सिन्हा यांची हेल्थ अपडेट
शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव सिन्हा याने 'इंडियन एक्स्प्रेस' सोबत बोलताना सांगितले की, सोनाक्षीचे लग्न झाल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा गेल्या काही दिवसांपासून व्हायरल तापाने त्रस्त आहेत. तापामुळे त्यांना अशक्तपणा जाणवत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी योग्य तपासणी करून चांगले उपचार व्हावेत यासाठी आम्ही त्यांना रुग्णालयात दाखल केले असल्याचे लव सिन्हा यांनी सांगितले.सध्या शत्रुघ्न सिन्हा यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
रुग्णालयात पोहचली होती सोनाक्षी-झहीर
लग्नाच्या दोन दिवसातच सोनाक्षी-झहीर हे मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात आल्याने उलटसुलट चर्चा सुरू झालेल्या. मात्र, काही तासानंतर शत्रुघ्न सिन्हा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यामुळे चर्चांना उधाण आले होते. आता, लव सिन्हाच्या माहितीनंतर या चर्चांना पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे.
सोनाक्षीच्या लग्नाची बातमी समोर येताच शत्रुघ्न सिन्हा हे नाखुश असल्याचं म्हटलं जात होतं. पण सोनाक्षीच्या लग्नात त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदच साऱ्या प्रश्नांची उत्तर देऊन गेला. दरम्यान लग्नातील धावपळीमुळे त्यांना थकवा आल्याचे समोर आले.
सोनाक्षी आणि झहीरची लव्हस्टोरी
View this post on Instagram
सोनाक्षी आणि झहीर अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने (Salman Khan) आयोजित केलेल्या पार्टीत सोनाक्षी आणि झहीरची पहिली भेट झाली. त्यांच्यात चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले. सोनाक्षी आणि जहीरने 'डबल XL' नामक चित्रपटात एकत्र काम केलं आहे. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर मागील वर्षी दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं प्रेम जगजाहीर केलं. दोघांनी आजवर एकमेकांसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केलेले आहेत.