(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2022: केकेआरच्या पराभवाची ‘ही’ आहेत प्रमुख कारणे!
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सहाव्या सामन्यात कोलकात्याला बंगळुरूकडून तीन विकेट्सनं पराभव स्वीकारवा लागला आहे.
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सहाव्या सामन्यात कोलकात्याला बंगळुरूकडून तीन विकेट्सनं पराभव स्वीकारवा लागला आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून बंगळुरूच्या संघानं कोलकात्याला प्रथम फलंदाजी करण्यासाटी आमंत्रित केलं होतं. त्यानंतर फलंदाजी करण्यासाटी मैदानात आलेल्या कोलकात्याचा संघाला 20 षटकात केवळ 128 धावांपर्यंत मजल मारता आली. प्रत्युरात आरसीबीच्या संघानं तीन विकेट्स राखून कोलकात्याला पराभूत . दरम्यान, आरसीबीच्या विजयाची आणि कोलकात्याच्या पराभवाची प्रमुख कारणं जाणून घेऊयात.
कोलकात्यानं टॉस गमवला
आयपीएल पंधराव्या हंगामात मुंबईच्या स्टेडियमवर आतापर्यंत तीन सामने खेळण्यात आले आहेत. यातील सर्व सामने टॉस जिंकणाऱ्या संघानं जिंकले आहेत. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, टॉस जिंकणाऱ्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. कारण, सामन्याच्या सुरुवातील बॉलमध्ये हालचाल होते. ज्यामुळं फलंदाजाला अनेक समस्या होतात. एवढेच नव्हेतर, पहिल्यांदा फलंदाजी करून मैदानात उतरलेला संघाला गोलंदाजी करणं थोडं आव्हानात्मक होतं. अशा परिस्थितीत केकेआरचे टॉस हरणे हे सामना हरण्याचे मोठे कारण होते.
केकेआरच्या फलंदाजांची खराब कामगिरी
केकेआरच्या टॉप आणि मधल्या फळीतील फलंदाजांचं प्रदर्शन खराब ठरलं. कोणत्याही खेळाडूला 30 धावांचा आकडा गाठता आला नाही. केकेआरचा अष्टपैलू खेळाडू आंद्र रसलनं सर्वाधिक 25 धावा केल्या. ज्यामुळं संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
श्रेयस अय्यरची मोठी चूक
या सामन्यात श्रेयस अय्यरनं केकेआरचे महत्वाचे गोलंदाज टीम साऊथी आणि उमेश यादव यांचे षटक संपवून टाकले. ज्यामुळं अखेरच्या दोन षटक व्यंकटेश अय्यर आणि आंद्रे रसल यांना करावा लागले. अखेरच्या दोन षटकात उमेश यादव आणि टीम साऊथी गोलंदाजी केली असते, तर कदाचित सामन्याचा निकाल काही वेगळा असता.
दिनेश कार्तिकला रनआऊट करण्याची संधी हुकली
या सामन्यातील 19 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर दिनेश कार्तिकला रन आऊट करण्याची संधी हुकली. उमेश यादवच्या खराब थ्रोमुळं दिनेश कार्तिकला जीवनदान मिळालं. दिनेश कार्तिक रनआऊट झाला असता तर, केकेआरच्या संघ सामन्यात पुनारागमन करू शकला असता. त्यावेळी आरसीबीला 10 चेंडूत 16 धावांची आवश्यकता होती. दिनेश कार्तिक आऊट झाला असता तर, आरसीबीचे 8 विकेट्स पडले असते. त्यानंतर मैदानात येणाऱ्या फलंदाजाला 10 चेंडूत 16 धावा करणं कदाचित कठीण झालं असतं.
वरूण चक्रवर्तीची खराब गोलंदाजी
कोलकात्याकडून फिरकीपटू सुनील नारायणनं 4 षटकात 12 धावा दिल्या. तर, दुसरीकडे वरूण चक्रवर्तीनं 4 षटकात 33 धावा दिल्या. गोलंदाजीत वरूण काफी महाग ठरला.
हे देखील वाचा-
- IPL 2022, KKR vs RCB : आरसीबीकडून पराभवानंतरही केकेआरच्या 'फायटींग' खेळीवर कर्णधार श्रेयस खुश, म्हणाला...
- IPL 2022, LSG vs CSK : चेन्नई विरुद्ध लखनौ सामन्यात कोण चमकणार?, 'या' पाच जणांवर असेल साऱ्यांची नजर
- LSG vs CSK : चेन्नई विरुद्ध लखनौ आमने-सामने, अशी असू शकते संभाव्य अंतिम 11
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha