IPL 2022: चेन्नईचं कर्णधारपद मिळाल्यानंतर रविंद्र जाडेजाचं महेंद्रसिंह धोनीबाबत मोठं वक्तव्य
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला काहीच तास शिल्लक असताना महेंद्रसिहं धोनीनं चेन्नईच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिलाय.
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला काहीच तास शिल्लक असताना महेंद्रसिहं धोनीनं चेन्नईच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिलाय. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा आता चेन्नईच्या संघाचं नेतृत्व करणार आहे. चेन्नईच्या संघाची जबाबदारी मिळाल्यानंतर रवींद्र जाडेजानं महेंद्रसिंह धोनीबात मोठं वक्तव्य केलंय. महेंद्रसिंह धोनीचा वारसा पुढे चालवणे हे त्याच्यासाठी आव्हानात्मक असणार असल्याचं त्यानं म्हटलंय. याशिवाय त्यानं महेंद्रसिंह धोनीचंही भरभरून कौतुकही केलंय.
कर्णधार म्हणून धोनीची आयपीएलमधील कामगिरी
आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून महेंद्रसिंह धोनी चेन्नईच्या संघाचं नेतृत्व करीत आहे. दरम्यान, चेन्नई आणि राजस्थानच्या संघावर स्पॉट फिक्सिंगप्रकरणी दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती. त्यांच्याऐवजी पुणे सुपर जाइंट्स आणि गुजरात लायन्स हे दोन संघाचा आयपीएलमध्ये समावेश करण्यात आला. धोनीच्या नेतृत्वात 2016 मध्ये पुण्याच्या संघानं निराशाजनक कामगिरी केली. त्यानंतर 2017 मध्ये धोनीनं कर्णधारपदाचा राजीनामा देत संघाचं कर्णधारपद स्टीव्ह स्मिथकडं सोपवलं. त्यानंतर महेंद्रसिंह धोनीनं 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
धोनीच्या नेतृत्वात चेन्नईच्या संघानं चार वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नईच्या संघानं चार वेळा आयपीएलचा खिताब जिंकलाय. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नईच्या संघानं 204 सामने खेळले आहेत. त्यापैकी 121 सामन्यात चेन्नईनं विजय मिळवलाय. तर, 82 सामन्यात पराभव स्वीकारला आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईची विजयाची टक्केवारी 59. 60 टक्के इतकी आहे. एवढेच नव्हेतर धोनीनं चेन्नईच्या संघाला 8 वेळा आयपीएलच्या फायनलमध्ये पोहचवलं आहे. तर, 11 वेळा प्लेऑफपर्यंत गेलीय.
रवींद्र जाडेजा विरुद्ध श्रेयस अय्यर
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात चेन्नईचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. दोन्ही संघ आपपल्या नवीन कर्णधाराच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहेत. चेन्नईच्या संघाचं कर्णधारपद रवींद्र जाडेजा करणार आहे. तर, श्रेयस अय्यर कोलकाताच्या संघाचं नेतृत्व करणार आहे.
हे देखील वाचा-
IPL 2022 : आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा चारहून अधिक विकेट घेणारे गोलंदाज, टॉपवर आहे केकेआरचा खेळाडू
MS Dhoni Captaincy Record : 'कॅप्टन कूल'शिवाय आयपीएल, पाहा कर्णधार म्हणून कसा आहे धोनीचा विक्रम
CSK New Captain: महेंद्रसिंह धोनीनं कर्णधारपद सोडलं, हुकमी 'एक्क्या'कडं सोपवली जबाबदारी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha