लग्न पुढे ढकलल्याच्या उलट सुलट चर्चा; स्मृती मानधनासह पलाशनीही इंस्टाग्राम बायो केला अपडेट, चर्चांना उधाण
आता स्मृती आणि पलाश या दोघांच्याही इन्स्टा बायो अपडेट झाल्याचं दिसतंय. दोघांनीही त्यांच्या बायोमधे एकच ईमोजी लावल्याने चर्चा रंगलीय.

Smriti Mandhana Palash Muchchal: भारताची स्टार क्रिकेटर स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. हाय प्रोफाईल लग्नाचं रुपांतर आता गॉसिप, अफवा आणि संभ्रमात झालंय. हळद, संगीत दणक्यात पार पडल्यानंतर बोहल्यावर चढण्याच्या एक दिवस आधी लग्न पुढे ढकलल्याचं सांगण्यात आलं. स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृती खालावल्यामुळे लग्न पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात आलं.नंतर पालाशची तब्येतही बिघडल्याचं सांगण्यात आलं. पण नंतर पलाश मुच्छलचे फ्लर्टी चॅट्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि वेगवेगळ्या तर्क-वितर्कांना उधाण आलं. नंतर सोशल मीडियावर मात्र चर्चा यामुळे रंगत गेली ती स्मृतीने आपल्या instagram अकाउंट वरील लग्नासंबंधीचे सगळ्या पोस्ट डिलीट केल्या. मात्र, पलाशसोबतचे काही साधे फोटो अजूनही त्याच्या प्रोफाईलवर दिसत आहेत. स्मृतीचे वडील आणि पलाश आता दोघेही रुग्णालयातून परत आले आहेत. पण लग्नाच्या नव्या तारखेची घोषणा अद्याप झालेली नाही. दरम्यान, आता स्मृती आणि पलाश या दोघांच्याही इन्स्टा बायो अपडेट झाल्याचं दिसतंय. दोघांनीही त्यांच्या बायोमधे एकच ईमोजी लावल्याने चर्चा रंगलीय.


स्मृती मानधनाने तिच्या इन्स्टा बायोवर नजर ईमोजी लावलय. हा सेम इमोजी पालाशचा प्रोफाइलवरही दिसतोय. ही बाब सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा केवळ एक योगायोग आहे की सेम इमोजी लावल्याने स्मृती आणि पलाशचं सगळं ठीक असल्याचा संकेत आहे? हे अधिकृत स्पष्टीकरणानंतरच समोर येईल. दरम्यान एका इमोजीने चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
Smriti Mandhana and Palaash Muchhal both added Nazar (🧿) emoji in their bio ...What Going On 🥴...it's just a coincidence 😯 🫡#ViratKohli𓃵 #SmritiMandhana #PalaashMuchhal #Cricket #WPL2026 #ViratKohli #RohitSharma pic.twitter.com/q7ENiC2lmH
— Just Shiva (@ShivaTi99) November 28, 2025
So Smriti Mandhana and Palash Muchhal both updated their bio to 🧿
— Ranajoy Mitra (@RanajoyMitra5) November 28, 2025
So everything is fine between them and all those rubbish theories gone to trash
Haters tried their best but trust is more powerful and said indirectly: Buri nazar walo ka muh kala#SmritiMandhana #PalashMuchhal pic.twitter.com/Jc6VldKWOz
दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी आरोग्याच्या कारणामुळेच लग्न पुढं ढकलल्याचं सांगण्यात आलं. दुसरीकडे पलाश ची आई अमिता यांना लग्न लवकरच होईल अशी आशा आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना लग्नाच्या दिवशी घडलेल्या घटनेमुळे स्मृती आणि पलाश दोघेही दुःखी आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू पलाश सोबत लग्न केल्यानंतर आपल्या घरी येणार, स्मृतीचं घरात जंगी स्वागत करण्याच्या योजनाही आम्ही आखल्या होत्या असं अमिता यांनी सांगितलं होतं. अनपेक्षित परिस्थितीमुळे दोन्ही कुटुंब अस्वस्थ झाले आहेत. लग्न विधी पुढे ढकलावे लागले असले तरी लग्न लवकरच होईल असा विश्वास पलाश ची आई अमिता यांना आहे.























