Pat Cummins : पॅट कमिन्सचे फायनलपूर्वीचे 'ते' शब्द काही तासांमध्ये खरे ठरले... हैदराबादचा कॅप्टन नेमकं काय म्हणालेला?
Pat Cummins :कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायजर्स हैदराबादला पराभूत करत आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं. या मॅचपूर्वी पॅट कमिन्स जे बोलला होता ते खरं ठरलं.
IPL Final KKR vs SRH चेन्नई : कोलकाता नाईट रायडर्सनं (Kolkata Knight Riders) आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात चेन्नईच्या एम. चिदंबरम स्टेडियमवर आयपीएलची फायनल पार पडली. या फायलनमलध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं एकतर्फी विजय मिळवला. कोलकाता नाईट रायडर्सनं तिसऱ्यांदा विजेतेपदावर नाव कोरलं. सनरायजर्स हैदराबादला कोलकाताच्या गोलंदाजांनी 113 धावांवर रोखलं होतं. यानंतर केकेआरनं 11 व्या ओव्हरमध्येच विजय मिळवला. व्यंकटेश अय्यरनं अर्धशतक झळकावत संघाला विजयापर्यंत पोहोचवलं. सनरायजर्स हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्सनं फायनलपूर्वी एक वक्तव्य केलं होतं. ते वक्तव्य अवघ्या काही तासांमध्ये खरं ठरलं.
पॅट कमिन्स काय म्हणाला होता?
सनरायजर्स हैदराबाद 2023 च्या आयपीएलमध्ये गुणतालिकेत दहाव्या स्थानावर होतं. सनरायजर्सची संघमालक काव्य मारन हिनं आयपीएल ऑक्शनमध्य कोट्यवधींची बोली लावत पॅट कमिन्सला आपल्या संघात घेतलं होतं. पॅट कमिन्सनं ऑस्ट्रेलियाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आणि भारतात झालेला वनडे वर्ल्ड कप जिंकवून दिला होता.
फायनल मॅचेसमध्ये विजय मिळवण्याचं पर्व कधीही संपू शकतं याची जाणीव पॅट कमिन्सला होती. पॅट कमिन्सनं आयपीएल फायनलपूर्वी मोठं वक्तव्य केलं होतं. ते वक्तव्य खरं ठरलं आहे. "विजेतेपद मिळवणं शानदार असतं मात्र हा प्रवास कधी ना कधी संपणार आहे" असं पॅट कमिन्सनं म्हटलं होतं. पॅट कमिन्सनं अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी या युवा खेळाडूंचं कौतुक केलं होतं.
आयपीएल फायनलवर केकेआरचं वर्चस्व
कोलकाता नाईट रायडर्सनं आयपीएल फायनलमध्ये पहिल्या ओव्हरपासून वर्चस्व मिळवलं. सनरायजर्स हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्सनं टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केकेआरचा अनुभवी गोलंदाज मिशेल स्टार्क यानं पहिल्याच ओव्हरमध्ये धोकादायक अभिषेक शर्माला 2 धावांवर बाद केलं. यानंतर वैभव अरोरानं पुढच्याच ओव्हरमध्ये ट्रेविस हेडला शुन्यावर बाद केलं. केकेआरनं हैदराबादच्या सलामीवीरांना पहिल्या दोन ओव्हरमध्ये मॅचमध्ये बाद करुन विजयाचा पाया रचला. यानंतर केकेआरनं हैदराबादच्या नियमितपणे विकेट घेतल्या. मिशेल स्टार्कनं क्वालिफायर आणि एलिमिनेटरमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या राहुल त्रिपाठीला देखील बाद केलं. आंद्रे रसेल, हर्षित राणा, मिशेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन यांनी हैदराबादला मॅचमध्ये कमबॅक करु दिलं नाही. केकेआरच्या गोलंदाजांनी हैदराबादला 113 धावांवर बाद केलं.
केकेआरनं हैदराबादनं दिलेलं 114 धावांचं आव्हान अकराव्या ओव्हरमध्येच पूर्ण केलं. आयपीएल फायनलमध्ये केकेआरकडून रहमानुल्लाह गुरबाझ आणि व्यंकटेश अय्यर यांनी दमदार फलंदाजी केली आणि संघाच्या विजयाचा मार्ग सुकर केला.
संबंधित बातम्या :
गौतम गंभीर-चंदू पंडितचा डाव, श्रेयस अय्यरचं नेतृत्व, कोलकात्याच्या विजयाची 5 कारणं