एक्स्प्लोर

IPL Final : आयपीएलमध्ये तब्बल 10 वर्षांचा दुष्काळ संपवला, केकेआरच्या विजयाचे शिल्पकार कोण?

IPL Final 2024 : आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात दिमाखदार विजय मिळवत कोलकाता नाईट रायडर्सने दिमाखदार विजय मिळवला. केकेआरने हा विजय मिळवत आयपीएलमधील 10 वर्षांचा दुष्काळ संपवलाय.

IPL Final 2024 : आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात दिमाखदार विजय मिळवत कोलकाता नाईट रायडर्सने दिमाखदार विजय मिळवला. केकेआरने हा विजय मिळवत आयपीएलमधील 10 वर्षांचा दुष्काळ संपवलाय. केकेआरने 2014 मध्ये गौतम गंभीरच्या नेतृत्वात आयपीएलचा हंगाम जिंकला होता. त्यानंतर 10 वर्षांनी केकेआरला आयपीएलच्या चषकावर नाव कोरण्यात यश आलं आहे. दरम्यान, यंदाच्या हंगामात केकेआरकडून कोणी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली? केकेआरच्या विजयाचे शिल्पकार कोण ठरले ? जाणून घेऊयात... 

सुनील नारायणची अष्टपैलू कामगिरी 

केकेआरकडून संपूर्ण हंगामात सुनील नारायणने अष्टपैलू कामगिरी केली. आयपीएलच्या चषकावर नारायणचा सिंहांचा वाटा आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याने 14 सामन्यात 180 च्या स्ट्राईक रेटने 488 धावा कुटल्या. यामध्ये 1 शतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. फलंदाजी बरोबरच नारायणने गोलंदाजीमध्येही आपली चमक दाखवली. त्याने 14 सामन्यात 17 विकेट्स पटकावल्या आहेत. 

आंद्रे रसेलही दोन्ही बाजूंनी चमकला 

सुनील नारायण शिवाय आंद्रे रसेलनही फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चमक दाखवली. त्याने 14 सामन्यांमध्ये 19 विकेट्स पटकावत केकेआरची गोलंदाजी भक्कम करण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या सामन्यातही 3 विकेट्स पटकावत हैदराबादच्या संघाला मोठी धावसंख्या उभारु दिली नाही. गोलंदाजीशिवाय फलंदाजीतूनही रसेलने महत्वपूर्ण योगदान दिले. हार्ड हिटिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या रसेलने  222  धावा कुटल्या. यामध्ये एका अर्धशतकाचाही समावेश आहे. 

वरुण चक्रवर्तीच्या फिरकीच्या जादू 

वरुण चक्रवर्तीने यंदाच्या हंगामात त्याच्या फिरकीची जादू दाखवलीये. त्याने 14 सामन्यांमध्ये 21 विकेट्स पटकावल्या आहेत. केकेआरच्या संघ चालू हंगामात फिरकीमध्ये भक्कम मानला जात होता. कारण फिरकीची संपूर्ण जबाबदारी वरुण चक्रवर्तीच्या खांद्यावर होती. 

सलामीवीर फिल साल्ट तुफान फटकेबाजी 

केकेआरकडून यंदाच्या हंगामात सलामीवीर म्हणून फिल साल्टने तुफान फटकेबाजी केली. प्रत्येक सामन्यात सलामीवीरांनी चांगली कामगिरी करावी, अशी प्रत्येक संघाची अपेक्षा असते. फिल साल्टने प्रत्येक सामन्यातून आपली चमक दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याने 12 सामन्यात तब्बल 435 धावा कुटल्या. यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश होता. 

श्रेयस अय्यरची फटकेबाजी 

केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने यंदाच्या हंगामात  जोरदार फटकेबाजी केली. त्याने 14 सामन्यांत 351 धावा कुटल्या आहेत. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश होता. त्याने या हंगामात 146.86 स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. त्यामुळे कर्णधारपदाची जबाबदारी असलेल्या श्रेयसने फलंदाजीमधून महत्वपूर्व भूमिका बजावली. 

मिचेल स्टार्कचा भेदक मारा  

आयपीएल 2024 लिलावामध्ये मिचेल स्टार्कवर जवळपास 25 कोटींची बोली लावली होती. सुरुवातीला स्टार्क प्रचंड महागडा ठरला होता. विकेट तर मिळत नव्हत्याच, पण गोलंदाजीही महागडी ठरत होती. त्यामुळे कोलकाता आणि स्टार्कवर टीका केली जात होती. पण स्टार्कने आपल्याला घेऊन चूक केली नसल्याचं दाखलवून दिले. मिचेल स्टार्कने फायनल आणि क्वालिफायर 1 मध्ये भेदक मारा करत कोलकात्याच्या विजायचा मार्ग सुकर केला. स्टार्कने पॉवरप्लेमध्ये भेदक मारा केला. त्याने फायनलमध्ये महत्वाच्या दोन विकेट घेतल्या. स्टार्कने यंदाच्या आयपीएल हंगामात 13 डावात 17 विकेट घेतल्या. एक वेळा 4 विकेट घेण्याचा पराक्रमही त्याने केलाय. 

हर्षित राणाने 19 धावा पटकावल्या 

हर्षित राणा यानं कोलकात्यासाठी भेदक मारा केला. सुरुवातीला असो अथवा डेथ ओव्हर असो... त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले. फायनलमध्ये हर्षित राणा याने निर्धाव षटक टाकत हैदराबादच्या फलंदाजांना धावा काढू दिल्या नाहीत. कोलकात्याकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजात तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. हर्षित राणा याने 11 डावात 19 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. 24 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली.  हर्षित राणा याने 42.1 षटकं गोलंदाजी केली, यामध्ये 383 धावा खर्च केल्या.

इतर महत्वाच्या बातम्या 

कोरबो-लोरबो जीतबो... कोलकात्यानं तिसऱ्यांदा चषकावर कोरलं नाव, IPL 2024 फायनलमध्ये हैदराबादचा 8 विकेटने पराभव

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Vidhan Sabha Election 2024: शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Phalodi Satta Bazar Maharashtra Vidhan Sabha: राज्यात कोणाची सत्ता येणार, महायुती की मविआ? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी बातमी, फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 19 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सVidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया कशी असेल?TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaChhatrapati Sambhajinagar Election : संभाजीनगरात व्होटर आयडी जमा करून 1500 रूपये देण्याचा प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Vidhan Sabha Election 2024: शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Phalodi Satta Bazar Maharashtra Vidhan Sabha: राज्यात कोणाची सत्ता येणार, महायुती की मविआ? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी बातमी, फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Embed widget