(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pakistani Cricketer in IPL: शाहिद आफ्रीदी, शोएब अख्तर, शोएब मलिक... 'हे' 11 पाकिस्तानी क्रिकेटर्स खेळलेत IPL
Pakistani Cricketer in IPL: 31 मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. सुरुवातीचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेता गुजरात टायटन्समध्ये होणार आहे.
Pakistani Cricketer in IPL: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 चा सीझन 2 दिवसांनी म्हणजेच, 31 मार्चपासून सुरू होणार आहे. पहिला सामना महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेता गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात होणार आहे. गुजरातची कमान हार्दिक पांड्याच्या हाती आहे.
काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान सुपर लीगची (PSL) सांगता झाली. पीएसएलमध्ये शाहीन शाह आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली लाहोर कलंदर्सनी सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं आहे. पण आयपीएलमध्ये मात्र पाकिस्तानच्या खेळाडू खेळताना दिसणार नाहीत. पण यापूर्वी अनेक पाकिस्तानी खेळाडूंनी आयपीएल गाजवली आहे.
सर्वाधिक पाकिस्तानी खेळाडू केकेआरमधून खेळलेत
2008 च्या आयपीएल सीझननंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध चांगले नव्हते आणि राजकीय तणावामुळे पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये संधी देण्यात आली नव्हती. पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलच्या 2008 च्या सीझनमध्ये पहिली आणि शेवटची संधी मिळाली होती.
आयपीएलच्या पहिल्या सीझनमध्ये एकूण 8 संघ होते, त्यापैकी फक्त पाच संघातच पाकिस्तानी खेळाडू खेळले होते. 2008 च्या मोसमात शाहिद आफ्रिदी, शोएब मलिक आणि शोएब अख्तरसह 11 खेळाडूंना संधी देण्यात आली होती. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) मध्ये सर्वाधिक 4 पाकिस्तानी क्रिकेटपटू खेळले होते. यामध्ये सलमान बट, शोएब अख्तर, मोहम्मद हाफीज आणि उमर गुल यांचा समावेश होता.
'या' तिन्ही संघात पाकच्या खेळाडूंना संधी मिळालीच नाही
राजस्थान रॉयल्स (RR) संघात कामरान अकमल, युनूस खान, सोहेल तन्वीर या तीन खेळाडूंना संधी मिळाली. तर 2 खेळाडू मोहम्मद आसिफ आणि शोएब मलिक यांना दिल्ली डेअरडेव्हिल्स (DD) संघात स्थान मिळालं होतं. हैदराबादचा संघ डेक्कन चार्जर्स (DC) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) मध्ये 1-1 खेळाडूाला स्थान मिळालं होतं. हैदराबादनं शाहिद आफ्रिदीला आणि बंगळुरूच्या संघानं मिसबाह-उल-हकला संघात स्थान दिलं होतं.
चेन्नई सुपर किंग्स (CSK), किंग्ज इलेव्हन पंजाब (KXIP) आणि मुंबई इंडियन्स (MI) या संघातून मात्र आतापर्यंत एकही पाकिस्तानी खेळाडू खेळला नाही. राजस्थान रॉयल्समधून खेळत असलेल्या सोहेल तन्वीरनं एका सामन्यात 6 बळी घेण्याचा विक्रम केला होता, जो 11 वर्षे टिकला होता.
2008 मध्ये कोणत्या संघात किती पाकिस्तानी खेळाडूंना मिळाली जागा
- केकेआरमध्ये 4 प्लेयर्स खेळले : सलमान बट, शोएब अख्तर, मोहम्मद हफीज आणि उमर गुल शामिल
- राजस्थानच्या संघात 3 प्लेयर्स खेळले : कामरान अकमल, यूनुस खान, सोहेल तनवीर
- दिल्लीतू 2 पाकिस्तानी प्लेयर्स : मोहम्मद आसिफ आणि शोएब मलिक
- हैदराबादचा संघ डेक्कन चार्जर्समधून शाहिद आफ्रीदी आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमधून मिस्बाह उल हक हे दोघे खेळले होते.