(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kane Williamson : केन विल्यमसनच्या घरी आनंदी-आनंद, नव्या पाहुण्याचे आगमन
Kane Williamson Child : मुंबईविरुद्धच्या सामन्यानंतर आयपीएल स्पर्धा सुरु असताना केन मायदेशी परतला होता.
Kane Williamson For SRH :सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनच्या (Kane Williamson) जो न्यूझीलंड संघाचाही कर्णधार आहे. त्याच्या घरी नुकत्याच नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. त्याच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला असून केनने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्रामवरुन ही गोड बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे. केनने पत्नी साराचा बाळाला हातात घेतलेला फोटो शेअर केला आहे, ज्यात त्याची मोठी मुलगी मॅगीही दिसत आहे. त्यामुळे या फोटोला केनने कॅप्शन देताना, 'तुझ स्वागत आहे.' असं लिहिलं आहे.
सनरायजर्स हैदराबादने आयपीएलमधील 65 व्या सामन्यात कर्णधार केन विल्यमसनच्या (Kane Williamson) नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्सला तीन धावांनी मात दिली. पण त्याच सामन्यानंतर संघाचा कर्णधार केन त्वरीत मायदेशी परतला. केन यात कारणासाठी मायदेशी परतला होता. सनरायजर्स हैदराबादने त्यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन ही माहिती दिली होती. दरम्यान आता केनला पुत्रप्राप्ती झाल्यानंतर संपूर्ण क्रिकेट जगतातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
यंदा केनची सुमार कामगिरी
वर्ल्ड क्रिकेटमधील एक अव्वल दर्जाचा फलंदाज आणि कर्णधार केन विल्यमसन यंदा सनरायजर्स हैदराबादचं नेतृत्त्व करत होता. पण संघाकडून आणि केनकडून यंदा खास कामगिरी झाली नसल्याने हैदराबादचं यंदाचं आव्हान संपुष्टात आलं. केनने यंदा 13 सामने खेळताना केवळ 216 धावाच केल्या. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेटही 93.50 इतकाच होता. केनने यंदा केवळ एक अर्धशतक झळकावलं. 57 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.
हे देखील वाचा-