एक्स्प्लोर

MI vs RR: मुंबई इंडियन्सचा सलग तिसरा पराभव; हार्दिक पांड्याने कोणाला धरले जबाबदार?, पाहा नेमकं काय बोलला!

MI vs RR Marathi News: राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात मुंबईचा घरच्या मैदानावर वानखेडे स्टेडियमवर 6 गडी राखून पराभव झाला. 

MI vs RR Marathi News: हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला आयपीएल 2024 मध्ये सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात मुंबईचा घरच्या मैदानावर वानखेडे स्टेडियमवर 6 गडी राखून पराभव झाला. 

आतापर्यंत हार्दिकचे कर्णधारपद मुंबईसाठी अपयशी ठरले आहे. हार्दिकचा कर्णधार होण्याआधीच चाहते नाराज होते आणि आता संघाच्या खराब कामगिरीने त्यांना अधिकच राग आला आहे. याचदरम्यान राजस्थानविरुद्धच्या सामन्यानंतर संघाला हवी तशी सुरुवात मिळाली नसल्याचं हार्दिक पांड्याने सांगितले. 

सामन्यानंतर हार्दिक पांड्या म्हणाला की, "होय, आजची एक कठीण रात्र आहे. आम्हाला हवी तशी सुरुवात मिळाली नाही. आम्ही 150-160 धावा करण्याच्या चांगल्या स्थितीत होतो, पण माझ्या विकेटमुळे राजस्थानने पुन्हा कमबॅक केले. मला अजून खूप काही करायचं होतं. ठीक आहे, आम्हाला अशा विकेटची अपेक्षा नव्हती,. एक संघ म्हणून आम्हाला खात्री आहे की आम्ही बरेच चांगले करू शकतो, असं हार्दिक पांड्याने सांगितले.

मुंबईची  खराब फलंदाजी-

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई संघाला 20 षटकांत 9 बाद 125 धावाच करता आल्या. संघाचे पहिले तीन फलंदाज गोल्डन डकला बळी पडले, ज्यात रोहित शर्मा, नमन धीर आणि देवाल्ड ब्रेस्विस यांचा समावेश होता. संघात फक्त कर्णधार हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा यांनी 30 धावांचा टप्पा ओलांडला होता. हार्दिकने 34 आणि टिळकने 32 धावा केल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सने 15.3 षटकांत 4 गडी राखून विजय मिळवला.

रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम-

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेल्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा दिनेश कार्तिकसह अव्वल स्थानावर पोहोचला आहे. आतापर्यंत रोहित शर्माशिवाय, दिनेश कार्तिक आयपीएलच्या इतिहासात 17 वेळा शून्यावर बाद झाला आहे. यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेल आहे. आतापर्यंत ग्लेन मॅक्सवेल 15 वेळा शून्यावर पॅव्हेलियनमध्ये पोहोचला आहे.

मुंबईची गोलंदाजी कशी राहिली ?

आकाश मधवाल याचा अपवाद वगळता मुंबईच्या एकाही गोलंदाजाला प्रभावी मारा करता आला नाही. आकाश मधवाल यानं 4 षटकांत 20 धावांच्या मोबदल्यात तीन फलंदाजांना तंबूत धाडलं. माफाका याला एक विकेट मिळाली, पण त्यानं दोन षटकांमध्ये 23 धावा खर्च केल्या. जसप्रीत बुमराह, गेराल्ड कोएत्जे आणि पियूष चावला यांच्या विकेटची पाटी कोरीच राहिली. कोइत्जे याने जवळपास प्रतिषटक 15 धावा खर्च केल्या. 

संबंधित बातम्या:

Rohit Sharma: मैदानावर अचानक तो धावत आला, रोहित शर्मा घाबरुन दोन पावले मागे गेला; स्वत:ला सावरत हात मिळवला! Video

Rohit Sharma: चाहत्यांकडून हार्दिक पांड्याला हूटिंग; रोहित शर्माची 5 सेकंड्सची रिॲक्शन अन् जिंकलं पुन्हा मन!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Human Metapneumovirus : भारतात एकाच दिवसात HMVP व्हायरस बाधित दुसरा रुग्ण सापडला, महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर!
भारतात एकाच दिवसात HMVP व्हायरस बाधित दुसरा रुग्ण सापडला, महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर!
Nandurbar News : मोठी बातमी : 23 वर्षीय दिपाली चित्तेला भोसकलं, तरुणीच्या मृत्यूने महाराष्ट्र हादरला
मोठी बातमी : 23 वर्षीय दिपाली चित्तेला भोसकलं, तरुणीच्या मृत्यूने महाराष्ट्र हादरला
Beed Crime: संतोष देशमुख प्रकरणात सीआयडीच्या मोठ्या हालचाली, वाल्मिक कराडला मकोका लागणार?
मोठी बातमी: वाल्मिक कराडला मोक्का लागणार? सीआयडीच्या हालचालींना वेग
Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, इन्स्टाग्राम लाईव्हवर शिवीगाळ
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, इन्स्टाग्राम लाईव्हवर शिवीगाळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

What Is HMPV virus : चीनमध्ये HMPV व्हायरस, जगाला धडकी; नवा व्हायरस कोरोनापेक्षाही घातक?ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 06 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सBengaluru HMPV First Patient Found : भारतात HMPVचा पहिला बाधित आढळला, 8 महिन्याच्या बाळाला लागणसकाळी १० च्या100 हेडलाईन्स- Top Headlines at 10AM 06 January 2025  Top 100 at 10AM Superfast

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Human Metapneumovirus : भारतात एकाच दिवसात HMVP व्हायरस बाधित दुसरा रुग्ण सापडला, महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर!
भारतात एकाच दिवसात HMVP व्हायरस बाधित दुसरा रुग्ण सापडला, महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर!
Nandurbar News : मोठी बातमी : 23 वर्षीय दिपाली चित्तेला भोसकलं, तरुणीच्या मृत्यूने महाराष्ट्र हादरला
मोठी बातमी : 23 वर्षीय दिपाली चित्तेला भोसकलं, तरुणीच्या मृत्यूने महाराष्ट्र हादरला
Beed Crime: संतोष देशमुख प्रकरणात सीआयडीच्या मोठ्या हालचाली, वाल्मिक कराडला मकोका लागणार?
मोठी बातमी: वाल्मिक कराडला मोक्का लागणार? सीआयडीच्या हालचालींना वेग
Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, इन्स्टाग्राम लाईव्हवर शिवीगाळ
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, इन्स्टाग्राम लाईव्हवर शिवीगाळ
Walmik Karad : 'खाकी' आहे खंडणीखोर, हाफ मर्डर करणाऱ्यांच्या साक्षीला! दोन शासकीय बाॅडीगार्ड ठेवणाऱ्या वाल्मिक कराडवर 15 गुन्हे, सुदर्शन घुले त्याच्या पुढचा निघाला
'खाकी' आहे खंडणीखोर, हाफ मर्डर करणाऱ्यांच्या साक्षीला! दोन शासकीय बाॅडीगार्ड ठेवणाऱ्या वाल्मिक कराडवर 15 गुन्हे, सुदर्शन घुले त्याच्या पुढचा निघाला
चीनमधील HMPV व्हायरसच्या बातमीनं काळजात धडकी भरली, महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर; लक्षणं कशी ओळखावी?
चीनमधील HMPV व्हायरसच्या बातमीनं काळजात धडकी भरली, महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर; लक्षणं कशी ओळखावी?
Beed News: मनोज जरांगेंना तडीपार करा! धनंजय मुंडेंच्या समर्थकांचा गुणरत्न सदावर्तेंना व्हिडीओ कॉल
मनोज जरांगेंना तडीपार करा! धनंजय मुंडेंच्या समर्थकांचा गुणरत्न सदावर्तेंना व्हिडीओ कॉल
Team India : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया टेन्शनमध्ये! जसप्रीत बुमराह अन् मोहम्मद शमी स्पर्धेतून होणार बाहेर?
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया टेन्शनमध्ये! जसप्रीत बुमराह अन् मोहम्मद शमी स्पर्धेतून होणार बाहेर?
Embed widget