Rohit Sharma: मैदानावर अचानक तो धावत आला, रोहित शर्मा घाबरुन दोन पावले मागे गेला; स्वत:ला सावरत हात मिळवला! Video
Mumbai Indians Rohit Sharma: मुंबई आणि राजस्थान सामन्यागदरम्यान आपीएलच्या या हंगामातील दुसऱ्यांदा खेळाडूंच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे दिसून आले आहे.
Mumbai Indians Rohit Sharma Marathi News: ट्रेंट बोल्ट आणि युझवेंद्र चहलची घातक गोलंदाजी आणि रियान परागच्या आक्रमक फलंदाजीच्या बळावर राजस्थानने 27 चेंडू शिल्लक असताना मुंबईचा 6 गडी राखून पराभव केला. मुंबई इंडियन्सचा हा सलग तिसरा पराभव आहे. तर राजस्थानचा हा सलग तिसरा विजय आहे. घरच्या मैदानावर प्रथम खेळल्यानंतर मुंबई इंडियन्सला केवळ 125 धावा करता आल्या. यानंतर गोलंदाजांनी यशस्वी जैस्वाल, जोश बटलर आणि संजू सॅमसन यांना स्वस्तात बाद केले, मात्र रियाग परागने 39 चेंडूत नाबाद 54 धावा करत राजस्थान संघाला विजय मिळवून दिला.
मुंबई आणि राजस्थान सामन्यागदरम्यान आपीएलच्या या हंगामातील दुसऱ्यांदा खेळाडूंच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे दिसून आले आहे. मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 मधील घरच्या मैदानावरील पहिल्याच सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामना सुरू असताना अचानक प्रेक्षकाने मैदानावर धाव घेतली. अचानक जवळ आलेला प्रेक्षक पाहून रोहित शर्मा घाबरला आणि दोन-तीन पावले मागे गेला. पण, स्वतःला सावरून नंतर त्याने चाहत्याशी हात मिळवला, मिठी दिल्याचे पाहायला मिळाले.
A fan entered into the ground & hugged Rohit Sharma in Wankhede...!!!!pic.twitter.com/tWDVtfQYmD
— Johns. (@CricCrazyJohns) April 1, 2024
वानखेडेवरील राजस्थानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माच्या चाहत्यांनी वानखेडेबाहेर वातावरण निर्मिती केली होती. चाहत्यांनी मैदानात 'मुंबई का राजा रोहित शर्मा'च्या घोषणा दिल्या. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने या स्पर्धेत तीन सामने खेळले आहेत, परंतु त्यापैकी एकही सामना विजय मिळालेला नाही. हार्दिक पांड्या वानखेडेनवर नाणेफेकीसाठी आला होता. नाणेफेकीवेळी चाहत्यांकडून हार्दिक पांड्याला हूटिंग करण्यात आले. या सामन्याआधीच वानखेडेवर हार्दिक पांड्याला हूटिंगचा सामना करावा लागेल, असं म्हटलं जात होतं. सामना सुरु झाल्यानंतरच चाहत्यांनी हार्दिक पांड्याला हूटिंग केले.
मुंबईची गोलंदाजी कशी राहिली ?
आकाश मधवाल याचा अपवाद वगळता मुंबईच्या एकाही गोलंदाजाला प्रभावी मारा करता आला नाही. आकाश मधवाल यानं 4 षटकांत 20 धावांच्या मोबदल्यात तीन फलंदाजांना तंबूत धाडलं. माफाका याला एक विकेट मिळाली, पण त्यानं दोन षटकांमध्ये 23 धावा खर्च केल्या. जसप्रीत बुमराह, गेराल्ड कोएत्जे आणि पियूष चावला यांच्या विकेटची पाटी कोरीच राहिली. कोइत्जे याने जवळपास प्रतिषटक 15 धावा खर्च केल्या.
मुंबईचा संघ तळाशी -
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला आतापर्यंत एकही विजय नोंदवता आला नाही. तिन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. गुणतालिकेत मुंबईचा संघ दहाव्या क्रमांकावर पोहचला आहे. मुंबई हा एकमेव असा संघ आहे, ज्याला अद्याप एकही विजय नोंदवता आला नाही. तर दुसरीकडे कोलकाता आणि राजस्थान संघाला अद्याप एकाही पराभवाचा सामना करावा लागला नाही. राजस्थानचा संघ गुणातलिकेत पहिल्या क्रमांकावर आहे.