(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL Most Valuable Teams : फ्लॉप ठरलेला मुंबई यंदाचा सर्वाधिक मौल्यवान संघ, सीएसके-केकेआरला टाकले मागे
IPL 2022 Most Valuable Teams : मुंबई इंडियन्सची यंदाची कामगिरी लाजिरवानी असती तरी ब्रँड व्हॅल्यूमध्ये फरक पडला नाही. मुंबईपुढे शाहरुख आणि धोनीचे संघही फिके पडलेत.
IPL 2022 Most Valuable Teams : रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वातील मुंबई इंडियन्स (MI) संघासाठी यंदाचा हंगाम खराब राहिलाय. पण याचा मुंबईच्या ब्रँड व्हॅल्यूला काहीही फरक पडलेला नाही. फोर्ब्स मासिकानुसार (Business Magazine Forbes) मुंबई इंडियन्सची यंदाचा सर्वात मौल्यवान संघ आहे. पाच वेळच्या विजेत्या मुंबई संघ यंदाचा सर्वात मौल्यवान संघ ठरलाय. तर चार वेळा आयपीएल जिंकणारा चेन्नई संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर किंग खान शाहरुखचा केकेआर संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबई इंडियन्सची यंदाची कामगिरी लाजिरवानी असती तरी ब्रँड व्हॅल्यूमध्ये फरक पडला नाही. मुंबईपुढे शाहरुख आणि धोनीचे संघही फिके पडलेत.
फोर्ब्स मासिकानुसार, पाच वेळच्या आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सची किंमत सध्या 1.3 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 10 हजार कोटी असल्याचा अंदाज बांधला आहे. त्यासह सर्वाधिक मौल्यवान संघामध्ये मुंबई आघाडीवर आहे. बीसीसीआयचे माजी प्रमुख आणि व्यावसायिक एन. श्रीनिवासन यांचा चेन्नई दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नईची व्हॅल्यू 8806 कोटी रुपये आहे. तर शाहरुखच्या केकेआरची व्हॅल्यू 8424 कोटी रुपये आहे. कोलकाता तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच सहभागी झालेल्या लखनौ संघाची ब्रँड व्हॅल्यू 8233 कोटी रुपये आहे. लखनौ संघ सर्वात मौल्यवान संघामध्ये चौथ्या स्थानावर आहेत. दिल्ली कॅपिटल्स पाचव्या क्रमांकावर आहे. तर हार्दिकच्या नेतृत्वातील गुजरात संघ 6510 कोटीसह दहाव्या क्रमांकावर आहे...
पाहा आयपीएलच्या दहाही संघाची ब्रँड व्हॅल्यू -
IPL की सबसे मूल्यवान टीमें-2022
क्रमांक | संघाचे नाव | व्हॅल्यू (कोटी रुपयांमध्ये) |
1 | मुंबई | 9956 |
2 | चेन्नई | 8806 |
3 | कोलकाता | 8424 |
4 | लखनौ | 8233 |
5 | दिल्ली | 7926 |
6 | आरसीबी | 7850 |
7 | राजस्थान | 7658 |
8 | हैदराबाद | 7428 |
9 | पंजाब | 7084 |
10 | गुजरात | 6510 |
IPL 2022 मध्ये मुंबईची लाजिरवाणी कामगिरी -
पाच वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सची यंदा लाजिरवाणी कामगिरी झाली आहे. मुंबईला पहिल्या आठही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. यंदाच्या हंगामातील मुंबईचं आ्हान संपुष्टात आलेय. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माची बॅट यंदा शांतच आहे. रोहितला अद्याप एकही अर्धशतक झळकावता आलेलं नाही.