Mumbai Indians: 17 वर्षे, 14 संघ...आयपीएलमध्ये कोणताच संघ करु शकला नाही; मुंबई इंडियन्सने 4 वेळा केला पराक्रम
Mumbai Indians: उर्वरित 14 संघांना एकदाही असे करता आलेले नाही.
मुंबई : आयपीएल 2008 मध्ये सुरू झाली आणि आतापर्यंत 14 संघ या लीगमध्ये सहभागी झाले आहेत. डेक्कन चार्जर्स, कोची टस्कर्स केरळ, पुणे वॉरियर्स इंडिया, रायझिंग पुणे सुपरजायंट आणि गुजरात लायन्स यांना विविध कारणांमुळे काढून टाकण्यात आले असताना 10 संघ अजूनही खेळत आहेत. पण आतापर्यंतचा एक रेकॉर्ड आहे जो फक्त मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) नावावर आहे. उर्वरित 14 संघांना एकदाही असे करता आलेले नाही.
From @Jaspritbumrah93's brilliance to that dominating chase! 👌 👌
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2024
A quick recap to sum up @mipaltan's 2️⃣nd win on the bounce at Wankhede Stadium 🎥 🔽 #TATAIPL | #MIvRCB pic.twitter.com/A8sroBjcm0
16 व्या षटकात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग-
मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोरचे 196 धावांचे लक्ष्य अवघ्या 15.3 षटकांत पूर्ण केले. रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी संघाला स्फोटक सुरुवात करून दिली. दोघांनी शतकी भागीदारी केली. यानंतर सूर्यकुमार यादवनेही आक्रमक फलंदाजी केली. हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांनी नाबाद राहिले आणि संघाला हंगामातील दुसरा विजय मिळवून दिला. यासह मुंबईनेही मोठा पराक्रम केला.
17 पेक्षा कमी षटकांत 4 वेळा 190+ धावांचा पाठलाग-
मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत चार वेळा 17 षटकांत 190 किंवा त्याहून अधिक धावांचे लक्ष्य गाठले आहे. गेल्या वर्षी याच मैदानावर आरसीबीविरुद्ध मुंबईने 16.3 षटकांत 200 धावांचे लक्ष्य गाठले होते. 2017 मध्ये पंजाबविरुद्धही मुंबईने 15.3 षटकांत 199 धावा केल्या होत्या. 2014 मध्ये मुंबईने राजस्थानविरुद्धचा सामना 14.4 षटकांत 190 धावा करून जिंकला होता.
इतर संघांना एकदाही ते करता आले नाही-
मुंबई इंडियन्सशिवाय इतर कोणत्याही संघाला 17 षटकांत एकदाही 190 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य गाठता आलेले नाही. दिल्लीने गुजरात लायन्ससमोर 17.3 षटकांत 209 धावांचे लक्ष्य गाठले. तर राजस्थान रॉयल्सने 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 190 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी 17.3 षटके घेतली. भारतीय भूमीवर आयपीएलमध्ये सर्वोच्च लक्ष्य गाठण्याचा विक्रमही मुंबई इंडियन्सच्या नावावर आहे.
संबंधित बातम्या-
आरसीबीच्या अडचणी वाढल्या, मुंबईला मोठा फायदा; पाहा आयपीएलचे Latest Points Table
रोहित शर्मासोबत मस्ती करताना दिसला विराट कोहली; मैदानात नेमकं काय घडलं?, पाहा Video