IPL 2023 : चेन्नईला मोठा धक्का, आघाडीचा गोलंदाज आयपीएलबाहेर
IPL 2023 : आयपीएलचा रनसंग्राम सुरु होण्यापूर्वीच चेन्नईला मोठा धक्का बसला आहे.
Mukesh Choudhary has been ruled out of the IPL 2023 : आयपीएलचा रनसंग्राम सुरु होण्यापूर्वीच चेन्नईला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएलला मुकणार आहे. दीपक चाहरच्या अनुपस्थितीत मुकेश चौधरीने धारधार गोलंदाजी केली होती. पण दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएलला मुकेश चौधरी मुकणार आहे. पाठदुखीच्या त्रासामुळे मुकेश चौधरी (Mukesh Choudhary has been ruled out of the IPL 2023 ) आयपीएलमधून बाहेर गेलाय.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी पाठदुखीमुळे आयपीएलला मुकणार आहे. हा चेन्नईसाठी मोठा धक्का मानला जातोय. चेन्नईकडून अद्याप रिप्लेसमेंटची घोषणा करण्यात आलेली नाही. आयपीएल 2022 च्या लिलावावेळी चेन्नईने मुकेश चौधरी याला 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजमध्ये खरेदी केले होते. 2022 मध्ये दीपक चाहरच्या अनुपस्थितीत मुकेश चौधरी याने वेगवान गोलंदाजीची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती.
Mukesh Chaudhary ruled out of IPL 2023. (Reported by Cricbuzz).
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 30, 2023
आयपीएल 2022 मध्ये 26 वर्षीय मुकेश चौधरीने 13 सामन्यात 16 विकेट घेतल्या होत्या. सुरुवातीच्या षटकात प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना बाद करण्याचे मुकेश चौधरी याचे कौशल्य चेन्नईसाठी फायद्याचे होते. डिसेंबरपासून मुकेश चौधरी दुखापतीचा सामना करत आहे. 2 डिसेंबर 2022 रोजी महाराष्ट्र आणि सौराष्ट्र यांच्यातील सामन्यादरम्यान मुकेश चौधरी याला पाठदुखीचा त्रास झाला होता. अद्याप दुखापतीतून तो सावरलेला नाही.. तो आयपीएलला मुकण्याची शक्यता आहे. बेंगलोर येथीन एनसीएमध्ये तो फिटनेसवर काम करत आहे. मुकेश चौधरीआधी अष्टपैलू कायले जेमिसनही आयपीएलमधून बाहेर गेलाय. त्याजाही दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू सिसांदा मागाला याला चेन्नईने ताफ्यात घेतलेय.
धोनीलाही दुखापत -
सराव करताना धोनीही दुखापतग्रस्त झाला होता. पण चिंता करण्याचे कारण नसल्याचे संघ व्यवस्थापकाने सांगितेलय. धोनीची दुखापत गंभीर नाही. तो आयपीएलसाठी उपलब्ध असेल.. धोनी दुखापतीमुळे पहिल्या सामन्याला मुकणार असल्याची चर्चा रंगली होती.
Players ruled out of IPL 2023: दुखापतग्रस्त झाल्यामुळे आयपीएलला कोण कोण मुकणार?
मुंबई इंडियन्स - जसप्रीत बुमराह, जाय रिचर्सडन
चेन्नई सुपर किंग्स - मुकेश चौधरी आणि कायले जेमिसन
आरसीबी - विल जॅक्स
दिल्ली - ऋषभ पंत
कोलकाता - श्रेयस अय्यर
पंजाब किंग्स - जॉनी बेअस्टो
राजस्थान - प्रसिद्ध कृष्णा
आणखी वाचा :
GT vs CSK 1st Match : धोनी vs पांड्या, IPL 2023 च्या पहिल्या सामन्यात हे पाच खेळाडू ठरतील गेम चेंजर
आरसीबीला डबल धक्का! मॅक्सवेल-हेजलवूडच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह
इम्पॅक्ट प्लेअरचा इम्पॅक्ट पडणार, यंदाच्या आयपीएलमध्ये नवे नियम, जाणून घ्या सविस्तर
IPL 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा पराभव करणं सोपं नाही; पाहा ताकद आणि कमजोरी