एक्स्प्लोर

Rohit Sharma : 2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा 

Rohit Sharma : भारताचा  माजी कर्णधार रोहित शर्मा यांनी 2023 च्या वनडे वर्ल्ड  कपच्या फायनलमध्ये झालेल्या पराभवामुळं खूप दु:ख झाल्याचं सांगितलं. निवृत्तीचा विचार देखील मनात आलेला, असं तो म्हणाला. 

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा यांनी  2023 च्या वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये झालेल्या पराभवाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. पराभवामुळं इतकं दु:ख झालेलं की निवृत्ती घ्यायचा विचार मनात आलेला, असं रोहित शर्मा म्हणाला.  रोहित शर्मानं म्हटलं की ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या पराभवामुळं इतका खचलो होतो की क्रिकेटमधून कायमची निवृत्ती घेण्याचा विचार आलेला. मात्र, रोहित शर्माच्याच नेतृत्त्वात भारतानं  2024 चा टी 20 वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर मार्च 2025 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद मिळवलं. 

Rohit Sharma : रोहित शर्मा काय म्हणाला?

रोहित शर्मानं भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कपमध्ये दमदार फलंदाजी केली होती. त्यानं 11 मॅचमध्ये 54.27 च्या सरासरीनं  597 धावा केल्या होत्या. मात्र, अंतिम फेरीच्या लढतीत भारताचे फलंदाज अपयशी ठरले होते. 

भारताचा संघ अंतिम फेरीच्या सामन्यात 240 धावा करु शकला होता. त्यानंत ऑस्ट्रेलियानं या मॅचमध्ये सहजपणे विजय मिळवला होता. रोहित शर्मान म्हटलं की तो काळ त्याच्यासाठी खूप अवघड  होता. 2022 मध्ये कर्णधार झाल्यानंतर पहिलं ध्येय वनडे वर्ल्ड कप जिंकणं हे होतं. 

रोहित शर्मा म्हणाला की सर्व लोक दु:खी होते.  जे घडलं होतं, त्यावर विश्वास बसत नव्हता. व्यक्तिगत माझ्यासाठी खूप अवघड काळ होता. कारण मी त्या वर्ल्ड कपमध्ये सर्वस्व पणाला लावलं होतं. फक्त दोन तीन महिने अगोदर नव्हे तर जेव्हा 2022 मध्ये कर्णधार पद स्वीकारलं होतं तेव्हापासून असं रोहितनं म्हटलं. 

रोहित शर्मा पुढं म्हणाला की, अहमदाबादमध्ये झालेल्या पराभवानंतर मला प्रामाणिकपणे वाटलं की मला आता आणखी क्रिकेट खेळायचं नाही. त्या वर्ल्ड कपमध्ये सर्वस्व झोकून देऊन खेळलो होतो. जेव्हा पराभव झाला होता तेव्हा मला वाटलं की माझ्या शरिरात आणि डोक्यात काही राहिलं नाही, मला वाटलं की खेळानं माझी सर्व ऊर्जा हिरावून घेतली, असं रोहित शर्मानं म्हटलं.

दरम्यान, रोहित शर्मानं भारताला 2024 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद मिळवून दिलं. त्यानंतर त्यानं आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतर रोहित शर्मा कसोटीमधून निवृत्त झाला आहे. रोहित सध्या भारताकडून वनडे क्रिकेट खेळतोय.  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

T20 Mumbai League : ‘आमच्या टीममध्येही वैभव सूर्यवंशी!’; जेतेपद राखण्यासाठी ‘मराठा रॉयल्स’ सज्ज, कॅप्टन सिद्धेश लाड काय म्हणाला?
‘आमच्या टीममध्येही वैभव सूर्यवंशी!’; जेतेपद राखण्यासाठी ‘मराठा रॉयल्स’ सज्ज, कॅप्टन सिद्धेश लाड काय म्हणाला?
RCB vs GT IPL 2026 Final : एकही बॉल न खेळता आरसीबी पुन्हा चॅम्पियन होणार?; अहमदाबादमधून हवामानाबाबत मोठी अपडेट
एकही बॉल न खेळता आरसीबी पुन्हा चॅम्पियन होणार?; अहमदाबादमधून हवामानाबाबत मोठी अपडेट
Hardik Pandya : मुंबई इंडियन्सला रामराम ठोकताच हार्दिक पांड्या IPLचा इतिहास-भूगोल बदलणार?; 30 कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यासाठी 3 संघ शर्यतीत
मुंबई इंडियन्सला रामराम ठोकताच हार्दिक पांड्या IPLचा इतिहास-भूगोल बदलणार?; 30 कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यासाठी 3 संघ शर्यतीत
GT vs RR Match Fixing Allegation : राजस्थान विरुद्ध गुजरात सामना 'फिक्स' होता? चाहत्यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न, सगळेच हादरले, क्वालिफायर-2मध्ये नेमकं काय घडलं?
राजस्थान विरुद्ध गुजरात सामना 'फिक्स' होता? चाहत्यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न, सगळेच हादरले, क्वालिफायर-2मध्ये नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold : पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा मोठा परिणाम! सोन्याची खरेदी 70 टक्क्यांनी घटली, 'जुने मोडून नवे' दागिने करण्याकडे कल
पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा मोठा परिणाम! सोन्याची खरेदी 70 टक्क्यांनी घटली, 'जुने मोडून नवे' दागिने करण्याकडे कल
Shekhar Suman Video: मेलोनीला मेलोडी खाऊ घालत मेलोडीची किंमत वाढवली, माननीय मोदीजी तसाच रुपया हातात घेऊन फोटो काढा, काय माहीत कदाचित रुपयाची किंमत वाढेल; शेखर सुमनचा खोचक टोला
Video: मेलोनीला मेलोडी खाऊ घालत मेलोडीची किंमत वाढवली, माननीय मोदीजी तसाच रुपया हातात घेऊन फोटो काढा, काय माहीत कदाचित रुपयाची किंमत वाढेल; शेखर सुमनचा खोचक टोला, 'काॅकरोच'वरूनही तुफानी टोलेबाजी
जयंत पाटील माझे मामा, पण...; भाजप प्रवेशानंतर काय म्हणाले प्राजक्त तनपुरे, सुप्रिया सुळेंच्या भेटीचंही सांगितलं
जयंत पाटील माझे मामा, पण...; भाजप प्रवेशानंतर काय म्हणाले प्राजक्त तनपुरे, सुप्रिया सुळेंच्या भेटीचंही सांगितलं
Rishabh Pant : रिषभ पंतनं लखनौचं कर्णधारपद सोडलं, LSG चा कॅप्टन कोण होणार? टीम इंडियाच्या माजी खेळाडूनं तीन नावं सुचवली
रिषभ पंतनं आयपीएल संपण्यापूर्वी लखनौचं कर्णधार पद सोडलं, नवा कर्णधार कोण? भारताच्या माजी खेळाडूनं तीन नावं सुचवली
Bihar Politics : कितीही ताकद लावा, फोर्स बोलवा, पण बंगला सोडणार नाही; राबडी देवींचं बिहार सरकारला खुलं आव्हान
कितीही ताकद लावा, फोर्स बोलवा, पण बंगला सोडणार नाही; राबडी देवींचं बिहार सरकारला खुलं आव्हान
RBI Repo Rate : आरबीआय रेपो रेट वाढवणार की जैसे थे ठेवणार? वर्षाअखेरीस मोठ्या निर्णयाची शक्यता, गृहकर्ज महागणार?
आरबीआय रेपो रेट वाढवणार की जैसे थे ठेवणार? वर्षाअखेरीस मोठ्या निर्णयाची शक्यता, गृहकर्ज महागणार?
Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या आंदोलनस्थळी किती गर्दी? वाहनांच्या रांगा, आंदोलकांकडून रास्ता रोके, पाहा फोटो
मनोज जरांगेंच्या आंदोलनस्थळी किती गर्दी? वाहनांच्या रांगा, आंदोलकांकडून रास्ता रोके, पाहा फोटो
Delhi Police: दिल्लीत आयएसआयच्या 9 एजंटांना अटक; धार्मिक स्थळे आणि सरकारी इमारतींवर हल्ला करण्याचा कट उधळला, दादर रेल्वे स्थानकाची केली होती रेकी, भारतीय सूत्रधारांचा शोध सुरू
दिल्लीत आयएसआयच्या 9 एजंटांना अटक; धार्मिक स्थळे आणि सरकारी इमारतींवर हल्ला करण्याचा कट उधळला, दादर रेल्वे स्थानकाची केली होती रेकी, भारतीय सूत्रधारांचा शोध सुरू
Embed widget