आरसीबीला डबल धक्का! मॅक्सवेल-हेजलवूडच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह
RCB, IPL 2023 : आरसीबी आणि मुंबई यांच्यामध्ये दोन एप्रिल रोजी सामना होणार आहे.
RCB, IPL 2023 : आरसीबी दोन एप्रिलपासून आयपीएल आयपीएलच्या रनसंग्रामाला सुरुवात करणार आहे. आरसीबी आणि मुंबई यांच्यामध्ये दोन एप्रिल रोजी सामना होणार आहे. पण त्याआधीच आरसीबीसाठी वाईट बातमी आली आहे. ऑस्ट्रेलिायाचा दिग्गज वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड आणि अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल यांच्या खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह आहेत. दोन्ही खेळाडू दुखापतग्रस्त आहेत, त्यामुळे किती दिवस ते संघाबाहेर राहणार हा आरसीबीच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान नुकतीच वनडे मालिका पार पडली. अखेरच्या दोन सामन्यात दुखापतीमुळे मॅक्सवेल खेळू शकला नाही, तर दुखापतीमुळे हेजलवूडही संघाबाहेर होता. cricket.com.au च्या वृत्तानुसार, हेजलवूड दुखापतीमधून सावरत आहे. किमान दोन आठवडे तो आयपीएल खेळू शकणार नाही. दोन आठवड्यानंतर आयपीएलमध्ये हेजलवूड खेळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय ग्लेन मॅक्सवेल मुंबईविरोधात खेळण्याची शक्यता आहे. दुखापतीमधून तो अद्याप सावरलेला नाही.. नोव्हेंबर 2022 मध्ये मॅक्सवेल दुखापतग्रस्त झाला होता, त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाच्या संघात पुनरागमन केले, पण त्याची दुखापत पुन्हा बळावल्यामुळे तो आयपीएलमधील सुरुवातीच्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे.
दुखापतीबद्दल मॅक्सवेल काय म्हणाला ?
Maxi is ready to take off at the Chinnaswamy! Here’s what he had to say about playing in front of our home crowd, and his fitness.#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2023 @Gmaxi_32 pic.twitter.com/9poXw6F8Sp
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) March 25, 2023
आरसीबीच्या सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओद्वारे मॅक्सवेल म्हणाला, “पाय ठीक आहे. मला 100 टक्के बरे होण्यासाठी काही महिने लागतील. आशा आहे की माझा पाय स्पर्धेपूर्वी ठीक होई. पुढे बोलताना तो म्हणाला, “आयपीएल पुन्हा होम-अवे फॉरमॅटमध्ये असून मी होमग्राऊंडवर खेळण्यासाठी सज्ज आणि खूप उत्सुक आहे.''
दरम्यान, श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानंदु हसरंगाही काही सामन्यासाठी अनुपलब्ध असेल. श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान तीन सामन्याची टी 20 मालिका होणार आहे. हसरंगा त्यामुळे 8 एप्रिलपर्यंत आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही. पहिल्या दोन सामन्यासाठी तो उपलब्ध नसेल. दरम्यान, दुखापतीमुळे Will Jacks ही आयपीएलला मुकणार आहे. आरसीबीने Michael Bracewell याला त्याच्याजागी निवडले आहे.
2019 नंतर आरसीबी घरच्या मैदानावर खेळणार आहे. यंदापासून होम आणि अवे सामने होणार आहेत. RCB आयपीएलमधील आपला सुरुवातीचा सामना 2 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळणार आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धचा हा सामना आरसीबी घरच्या मैदानावर एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळणार आहे. तब्बल 3 वर्षांनंतर आरसीबी संघ आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणार आहे. तसेच आरसीबी त्यांचा शेवटचा साखळी सामना 21 मे रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध खेळेल.
आणखी वाचा :
IPL 2023 मध्ये रोहित शर्माला आराम दिला जाणार ? कोच मार्क बाऊचरने दिली हिंट
इम्पॅक्ट प्लेअरचा इम्पॅक्ट पडणार, यंदाच्या आयपीएलमध्ये नवे नियम, जाणून घ्या सविस्तर
IPL 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा पराभव करणं सोपं नाही; पाहा ताकद आणि कमजोरी