IPL 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा पराभव करणं सोपं नाही; पाहा ताकद आणि कमजोरी
करोना महामारीनंतर पुन्हा एकदा आयपीएल होम अॅण्ड अवे फॉर्मेटमध्ये खेळवण्यात येत आहे.
IPL 2023 News : आयपीएलमधील (IPL 2023) दहा संघामध्ये चेन्नईच्या संघ (CSK) आणि क्रीडा चाहत्यांमध्ये वेगळे नाते आहे, त्याला कारण म्हणजे एमएस धोनी होय. 41 वर्षीय धोनी चेन्नईला आतापर्यंत चार वेळा जेतेपद मिळवून दिलेय. तर नऊ वेळा फायनलमध्ये नेले आहे. धोनीच्या उपस्थितीत प्रतिस्पर्धी संघ दबावात जातो. कदाचीत धोनी (MS Dhoni) अखेरची आयपील स्पर्धा खेळण्याची शक्यता आहे. त्यामुळे धोनी आणि चेन्नईचा संघ ही स्पर्धा अविस्मरणीय करण्याच्या इरद्याने मैदानात उतरतील, यात शंका नाही.
कोरोना (Covid-19) महामारीनंतर पुन्हा एकदा आयपीएल होम अॅन्ड अवे फॉर्मेटमध्ये खेळवण्यात येत आहे. यामुळे चेन्नई आपला चेपॉकच्या मैदानावर सात सामने खेळणार आहे. चेपॉकच्या मैदानावर चेन्नईला हरवने सहजासहजी शक्य नाही. इथे चेन्नईच किंग आहे. गेल्यावर्षी चेन्नई संघाला प्लेऑफमध्ये पोहचता आले नव्हते. संघाची कमान जाडेजाच्या खांद्यावर होती. त्यानंतर अखेरच्या काही सामन्यात धोनीने नेतृत्व सांभाळले होते. आता विजयाने शेवट करण्याच्या इराद्याने धोनी मैदानात उतरणार, याद शंकाच नाही. चेन्नईल यंदा पराभव करणे कठीण असेल. कारण...संघातील अष्टपैलू खेळाडू, धोनी आणि चेपॉकची खेळपट्टी.. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स चेन्नईसाठी एक्स फॅक्टर ठरण्याची शक्यता आहे.
संघाची ताकद काय?
अष्टपैलू खेळाडूंचा भरणा हीच या संघाची सर्वात मोठी ताकद होय.. त्याशिवाय कर्णधार धोनीचे नेतृत्वही जमेची बाजू आहे. चेपॉकवरील संथ खेळपट्टीवर धोनी गोलंदाजांचा अचूक वापर करतो.. रविंद्र जाडेजा, मोईन अली, बेन स्टोक यांच्याशिवाय शिवम दुबे आणि दीपक चाहर यांच्या अष्टपैलू खेळाडू संघासाठी फायदेशीर ठरेल. त्याशिवाय डेवोन कोनवे आणि ऋतुराज गायकवाड यांची सलामी संघाची जमेची बाजू आहे.
कमजोरी काय?
मुकेश चौधरी दुखापतीमुळे खेळण्याची शक्यता कमी आहे. दीपक चाहर खूप दिवसानंतर संघात पुनरागमन करत आहे, त्याला लयीत येण्यास वेळ लागेल.. तसेच काही खेळाडू सुरुवाच्या सामन्यासाठी उपलब्ध नसतील.. संघाची योग्य ती मोट बांधण्याचे धोनीपुढे आव्हान असेल.. त्याशिवाय जाडेजाचा अपवाद वगळता भारतीय फिरकीपटू नाही.
संधी कुणाला?
अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत सिमरजीत आणि एम पथीराना यांना स्वतल सिद्द करण्याची मोठी संधी मिळणार आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई संघाचं वेळापत्रक, कुणाबरोबर अन् कधी होणार सामना :
31 मार्च 2023- चेन्नई सुपर किंग्स vs गुजरात टायटंस- नरेन्द्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
2 एप्रिल 2023- चेन्नई सुपर किंग्स vs लखनऊ सुपर जॉइंट्स- चेपक स्टेडियम, चेन्नई
8 एप्रिल 2023- चेन्नई सुपर किंग्स vs मुंबई इंडियन्स, वानखेडे स्टेडियम, मुंबई
12 एप्रिल 2023- चेन्नई सुपर किंग्स vsराजस्थान रॉयल्स, चेपक स्टेडियम, चेन्नई
17 एप्रिल 2023- चेन्नई सुपर किंग्स vs रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगलोर
21 एप्रिल 2023- चेन्नई सुपर किंग्स vsसनराइजर्स हैदराबाद, चेपक स्टेडियम, चेन्नई
23 एप्रिल 2023- चेन्नई सुपर किंग्स vs कोलकाता नाइट राइडर्स, ईडेन गार्डेन स्टेडियम, कोलकाता
27 एप्रिल 2023- चेन्नई सुपर किंग्स vs राजस्थान रॉयल्स, जयपुर
30 एप्रिल 2023- चेन्नई सुपर किंग्स vs पंजाब किंग्स, चेपक स्टेडियम, चेन्नई
4 मे 2023- चेन्नई सुपर किंग्स vs लखनऊ सुपर जॉइंट्स, इकाना स्टेडियम, लखनऊ
6 मे 2023- चेन्नई सुपर किंग्स vs मुंबई इंडियन्स, चेपक स्टेडियम, चेन्नई
10 मे 2023- चेन्नई सुपर किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स, चेपक स्टेडियम, चेन्नई
14 मे 2023- चेन्नई सुपर किंग्स vs कोलकाता नाइट राइडर्स, चेपक स्टेडियम, चेन्नई
20 मे 2023- चेन्नई सुपर किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स, अरूण जेटली स्टेडियम, दिल्ली