एक्स्प्लोर

आयपीएल खेळण्याची धोनीची इच्छा; मागील 10 वर्षांत पहिल्यांदाच घेतलेली एवढी मेहनत

धोनीने यंदा आयपीएलसाठी कसून मेहनत केली होती. गेल्या 10 वर्षांत धोनी पहिल्यादांच एवढे परिश्रम घेताला दिसून आला.

नवी दिल्ली : इंग्लंडमध्ये 2019 साली पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत महेंद्रसिंह धोनी जेव्हा रनआऊट झाला त्यावेळी संपूर्ण भारतीयांची निराशा झाली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातील पराभवामुळे विश्वचषकातील भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आलं. या संपूर्ण स्पर्धेत धोनीचा संथ खेळ हा चर्चेचा विषय ठरला होता. विश्वचषक स्पर्धेनंतर धोनी थेट आयपीएलच्या मैदानावर दिसणार होता. आयपीएल 2020 साठीच्या तयारीसाठी प्रत्येक संघाने तयारीला सुरुवात केली होती. प्रत्येक जण मैदानात कसून सराव करताना दिसून आला. यावेळी धोनेही आयपीएलसाठी कसून सरावाला सुरुवात केली. नेट्समध्ये सराव करताना धोनी षटकार आणि चौकार मारत असत. धोनीला पुन्हा एकदा सराव करताना पाहून चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. यावेळी गेल्या 10वर्षात पहिल्यांदाच धोनीला एवढ्या एकाग्रतेने सराव करताना पाहिल्याचं चेन्नई संघाच्या फिजिओंनी सांगितलं. पण कोरोमुळे धोनीने चेन्नईला रामाराम करत धोनीला रांचीला परतावं लागलं. धोनीने यंदा आयपीएलसाठी कसून मेहनत केली होती. गेल्या 10 वर्षांत धोनी पहिल्यादांच एवढे परिश्रम घेताला दिसून आला होता. गेल्या वर्षी चेन्नई संघात सामील झालेला चावलाने देखील धोनी सरावासाठी खूप मेहनत घेत असल्याचं सागितलं. तसेच सराव सामन्यातील फलंदाजीत धोनीचा सराव दिसून आल्याचं देखील बोलला. आयपीएल रद्द झाल्यास धोनीला टी-२० विश्वचषकात संधी मिळणार? विश्वचषक स्पर्धा आणि न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातील धोनीचा संथ खेळ चर्चेचा विषय ठरला. यानंतर आतापर्यंत धोनी एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात खेळलेला नाही. भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आयपीएलमध्ये चांगला खेळ केल्यास धोनीचा टी-२० विश्वचषकासाठी अजुनही विचार केला जाऊ शकतो असं वक्तव्य केलं होतं. पण आयपीएलच होणार की नाही यात आता शंका असल्याने धोनीच्या कमबॅकवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर 29 मार्चपासून सुरु होणारी इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 13चं आयोजन लांबणीवर पडलं होत. 29 मार्चपासून सुरु होणारी स्पर्धा आता 15 एप्रिलपासून सुरु होणार होती. पण आता लॉकडाऊनमुळे आता ती आशा देखील मावळली आहे. दरम्यान याआधी दिल्ली सरकारने राज्यातील आयपीएल सामन्यांच्या आयोजनावर बंदी घातली होती. तर महाराष्ट्र सरकारने राज्यात आयपीएल तिकीटांच्या विक्री बंदी घालण्याची घोषणा केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vikhroli Accident: भरधाव वेगात जीव गमावला; विक्रोळीतील भीषण अपघातात दोन जीवलग मित्रांवर काळाचा घाला, गाडीचा चक्काचूर
भरधाव वेगात जीव गमावला; विक्रोळीतील भीषण अपघातात दोन जीवलग मित्रांवर काळाचा घाला, गाडीचा चक्काचूर
Marathi Serial Updates Durga : सुरू होताच संपली 'अंतरपाट' मालिका! नवी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला
सुरू होताच संपली 'अंतरपाट' मालिका! नवी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला
महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? साताऱ्यात अनाथाश्रमातील सेक्स स्कॅन्डल उघड, तरुणींना वेश्याव्यावसायासाठी पाडलं भाग
महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? साताऱ्यात अनाथाश्रमातील सेक्स स्कॅन्डल उघड, तरुणींना वेश्याव्यावसायासाठी पाडलं भाग
बदलापूर अत्याचार प्रकरणात नवा ट्विस्ट; निलंबित शुभदा शितोळेंची मुंबईत बदली, दोन पत्रांनी संभ्रम, नेमकं खरं काय?
बदलापूर अत्याचार प्रकरणात नवा ट्विस्ट; निलंबित शुभदा शितोळेंची मुंबईत बदली, दोन पत्रांनी संभ्रम
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Thackeray Yavatmal :  यवतमाळ दौऱ्यात अमित ठाकरेंनी काढला खेळांसाठी वेळTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :23 ऑगस्ट 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 23 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 23 ऑगस्ट 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vikhroli Accident: भरधाव वेगात जीव गमावला; विक्रोळीतील भीषण अपघातात दोन जीवलग मित्रांवर काळाचा घाला, गाडीचा चक्काचूर
भरधाव वेगात जीव गमावला; विक्रोळीतील भीषण अपघातात दोन जीवलग मित्रांवर काळाचा घाला, गाडीचा चक्काचूर
Marathi Serial Updates Durga : सुरू होताच संपली 'अंतरपाट' मालिका! नवी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला
सुरू होताच संपली 'अंतरपाट' मालिका! नवी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला
महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? साताऱ्यात अनाथाश्रमातील सेक्स स्कॅन्डल उघड, तरुणींना वेश्याव्यावसायासाठी पाडलं भाग
महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? साताऱ्यात अनाथाश्रमातील सेक्स स्कॅन्डल उघड, तरुणींना वेश्याव्यावसायासाठी पाडलं भाग
बदलापूर अत्याचार प्रकरणात नवा ट्विस्ट; निलंबित शुभदा शितोळेंची मुंबईत बदली, दोन पत्रांनी संभ्रम, नेमकं खरं काय?
बदलापूर अत्याचार प्रकरणात नवा ट्विस्ट; निलंबित शुभदा शितोळेंची मुंबईत बदली, दोन पत्रांनी संभ्रम
डायमंड लीग स्पर्धेत नीरज चोप्राचा धमाका; ऑलिम्पिकपेक्षा चांगली कामगिरी, दुसरे स्थान पटकावले!
डायमंड लीग स्पर्धेत नीरज चोप्राचा धमाका; ऑलिम्पिकपेक्षा चांगली कामगिरी, दुसरे स्थान पटकावले!
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या दोन्ही जागा महायुतीकडे, धैर्यशील पाटील, नितीन पाटील यांची बिनविरोध निवड!
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या दोन्ही जागा महायुतीकडे, धैर्यशील पाटील, नितीन पाटील यांची बिनविरोध निवड!
Health : KEM रूग्णालयाच्या नेत्र विभागात 'मॉड्युलर शस्त्रक्रियागृह' सुरू! आता डोळ्यांची शस्त्रक्रिया होणार अधिक सुकर, जाणून घ्या..
Health : KEM रूग्णालयाच्या नेत्र विभागात 'मॉड्युलर शस्त्रक्रियागृह' सुरू! आता डोळ्यांची शस्त्रक्रिया होणार अधिक सुकर, जाणून घ्या..
आमदार बबनदादांचे पुत्र रणजितसिंह शिंदेंनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट, नेमकी काय झाली चर्चा?
आमदार बबनदादांचे पुत्र रणजितसिंह शिंदेंनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट, नेमकी काय झाली चर्चा?
Embed widget