एक्स्प्लोर

Video : कॅमेरामननं फॉलो केलं, लक्षात येताच महेंद्रसिंह धोनी भडकला, लगोलग कडक इशारा,पाहा व्हिडीओ

MS Dhoni :चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनौ सुपर जाएंटस यांच्यातील मॅच काल चेपॉकवर पार पडली. या मॅचमध्ये चेन्नईला लखनौनं पराभूत केलं.मॅचदरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

चेन्नई : आयपीएलमध्ये (IPL 2024) चेन्नई सुपर किंग्जची (Chennai Super Kings) मॅच आणि प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं चेपॉक हे समीकरण नेहमीचं झालंय. यंदाच्या आयपीएलची सुरुवात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बगंळुरु यांच्यातील मॅचनं झाली. यानंतर चेपॉकवर झालेली प्रत्येक मॅच चेन्नईनं जिंकली आहे. मात्र, काल लखनौ सुपर जाएंटसनं चेन्नई सुपर किंग्जला त्यांच्या होम ग्राऊंडवर पराभूत केलं. यंदाच्या आयपीएलमध्ये स्टार स्पोर्टसनं ज्यावेळी महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) मैदानात बॅटिंगसाठी एंट्री करतो त्यावेळी मैदानावरील आवाज मोजला जातो. महेंद्रसिंह धोनीची एक झलक टिपण्यासाठी कॅमेरामन लक्ष ठेवून असलेले असतात. असाच एक प्रयत्न करणाऱ्या कॅमेरामनला धोनीनं दिलेला इशारा चर्चेत आहे. 

महेंद्रसिंह धोनी बॅटिंगला येण्यापूर्वी त्याची झलक टिपण्याचं काम कॅमेरामन करत असतात. यंदाच्या आयपीएलमध्ये धोनीची एक झलक पाहण्यासाठी प्रेक्षक फार उत्सुक असतात. कॅमेरामन महेंद्रसिंह धोनीची प्रत्येक मॅचमध्ये ड्रेसिंग रुममधील छबी टिपण्याचा प्रयत्न करत असतात. 

चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनौ सुपर जाएंटस यांच्यातील मॅचमध्ये ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे फलंदाजी करत असताना  17 व्या ओव्हरमध्ये कॅमेरामननं धोनीवर कॅमेरा नेत झुम केला. कॅमेरा आपल्यावर असल्याचं लक्षात येताच धोनीनं त्याला बाटली फेकून मारण्याचा इशारा केला. महेंद्रसिंह धोनीनं दिलेल्या इशाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

चेन्नई सुपर किंग्जचा पराभव, गुणतालिकेत स्थान घसरलं

चेन्नई सुपर किंग्जनं कालच्या मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करताना 4 बाद 210 धावा केल्या होत्या. कॅप्टन ऋतुराज गायकवाड यानं 108 आणि शिवम दुबेनं 66 धावा केल्या. कॅप्टन म्हणून नेतृत्त्व करणारा ऋतुराज गायकवाड हा चेन्नई सुपर किंग्जचा पहिला खेळाडू ठरला आहे.  लखनौ सुपर जाएंटसनं सलग दुसऱ्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. लखनौ सुपर जाएंटसकडून मार्कस स्टोइनिसनं 124 धावांची खेळी करत विजयावर शिक्कामोर्तब केलं. 

चेन्नई सुपर किंग्जनं यंदाच्या आयपीएलमध्ये 8 मॅच खेळल्या आहेत. आठपैकी चार मॅचमध्ये चेन्नईला विजय मिळाला. तर, चेन्नई सुपर किंग्जचा चार मॅचमध्ये पराभव झाल्यानं ते गुणतालिकेत 8 गुणासंह पाचव्या स्थानावर आहेत. चेन्नई सुपर किंग्जला प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहायचं असल्यास पुढील सहा पैकी किमान चार मॅचमध्ये चांगल्या नेट रनरेटसह विजय मिळवावा लागेल. 

संबंधित बातम्या :

 ऋतुराज गायकवाडच्या शतकाचा डबल धमाका रोहित शर्माला धक्का, विराट कोहलीचं टेन्शन वाढवलं, ऑरेंज कॅपच्या यादीत मोठा उलटफेर

LSG vs CSK : ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानं कराराच्या यादीतून वगळलं, स्टोइनिसनं आयपीएल गाजवलं, तुफानी खेळीद्वारे उत्तर दिलं, म्हणाला...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान
रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान
व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  
व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  
ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 
ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 PM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सGhatkopar Bhavesh Bhinde : अपक्ष उमेदवार ते आरोपी, घाटकोपर  दुर्घटनेतील भावेश भिंडे नेमका कोण?Eknath Shinde Majha Vision Full : खोके ते कंटेनर, कसाब ते मुसा! शिदेंनी ठाकरेंना सर्व बाजूने घेरलंGhatkopar Hoarding Accident : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला 24 तास, बचावकार्य अजूनही सुरुच!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान
रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान
व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  
व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  
ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 
ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
पोरेल-स्टब्सची वादळी अर्धशतकं, दिल्लीचं लखनौसमोर 209 धावांचं आव्हान
पोरेल-स्टब्सची वादळी अर्धशतकं, दिल्लीचं लखनौसमोर 209 धावांचं आव्हान
IPL 2024 : प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, किंमत किती, खरेदी कसं कराल? 
IPL 2024 : प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, किंमत किती, खरेदी कसं कराल? 
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा
टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा
Embed widget