MS Dhoni CSK Captain : चेन्नईला मोठा धक्का! IPL 2025 मधून कर्णधार ऋतुराज गायकवाड बाहेर, MS धोनी करणार CSK संघाचे नेतृत्व
आयपीएल 2025 दरम्यान चेन्नई सुपर किंग्ज संघाला मोठा धक्का बसला आणि संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे.

MS Dhoni returns as CSK captain IPL 2025 : आयपीएल 2025 दरम्यान चेन्नई सुपर किंग्ज संघाला मोठा धक्का बसला आणि संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. ऋतुराज गायकवाडच्या अनुपस्थितीत, एमएस धोनी आता या हंगामातील उर्वरित सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करणार आहे.
🚨 OFFICIAL STATEMENT 🚨
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 10, 2025
Ruturaj Gaikwad ruled out of the season due to a hairline fracture of the elbow.
MS DHONI TO LEAD. 🦁
GET WELL SOON, RUTU ! ✨ 💛#WhistlePodu #Yellove🦁💛 pic.twitter.com/U0NsVhKlny
कर्णधार ऋतुराज गायकवाड का गेला बाहेर?
सीएसकेचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी केकेआर विरुद्धच्या सामन्यापूर्वी 10 एप्रिल रोजी ही माहिती दिली. ऋतुराज गायकवाडच्या कोपरात फ्रॅक्चर झाले आहे आणि त्यामुळे तो या स्पर्धेत खेळू शकणार नाही. 2024 मध्ये ऋतुराज गायकवाड यांना सीएसके संघाचा कर्णधार बनवण्यात आले आणि या हंगामातील पहिल्या 5 सामन्यांमध्येच त्याने संघाचे नेतृत्व केले आहे. 30 मार्च रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात गायकवाडला कोपराची दुखापत झाली. दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्जविरुद्धच्या पुढील दोन सामन्यांमध्ये तो खेळला असला तरी, स्कॅनमध्ये आता फ्रॅक्चरची पुष्टी झाली आहे.
सीएसकेने 5 पैकी 4 सामने गमावले
या हंगामातील पहिल्या 5 सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून ऋतुराज गायकवाडची कामगिरी फारशी चांगली नव्हती. त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने सलग 4 सामने हरले तर फक्त एक सामना जिंकला. सीएसकेने या हंगामातील पहिला सामना मुंबईविरुद्ध जिंकला होता, पण त्यानंतर त्यांना चारही सामने गमावावे लागले. यापूर्वी, ऋतुराजच्या नेतृत्वाखाली गेल्या हंगामातही सीएसकेला गट टप्प्याच्या पुढे प्रगती करता आली नाही.
🚨 MS DHONI WILL BE CAPTAINING CSK IN IPL 2025. 🚨
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 10, 2025
- Ruturaj Gaikwad ruled out due to injury. pic.twitter.com/as1NwVSRsD
MS धोनी करणार CSK संघाचे नेतृत्व
2024 च्या आधी एमएस धोनीने सीएसकेचे कर्णधारपद सोडले होते, परंतु तो पुन्हा एकदा कर्णधार म्हणून परतला आहे. आता तो उर्वरित सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करताना दिसेल. धोनीच्या नेतृत्वाखाली, सीएसके आतापर्यंत 5 वेळा चॅम्पियन बनले आहे, आता तो पुन्हा एकदा कर्णधार झाल्यानंतर सर्वांच्या नजरा संघाच्या कामगिरीवर असतील. या हंगामात सीएसकेची स्थिती चांगली नाही आणि धोनी आता त्याच्या संघाला कसे हाताळतो हे पाहणे मनोरंजक असेल.





















